Viral Video: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नाचायला खूप आवडतं. काही बॉलीवूड गाण्यांवर नाचतात तर काही देसी गाण्यांवर. सध्या सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, याच दरम्यान एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडीओमध्ये आजी आणि नातू रस्त्यावर जोरदार नाचताना दिसत आहेत. त्याच्याभोवती हजारो लोक जमा झाले आहेत. आजी आणि नातवाच्या जोडीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा रुमालाची पुंगी बनवून नाचू लागतो. यामध्ये नातवाची आजी गर्दीतून बाहेर येते आणि पुंगी वाजवताच नाचू लागते. गाणे वाजवताच आजी इतक्या जोरात नाचते की आजूबाजूचे लोकही घाबरतात.
(हे ही वाचा: IPL 2022: एक लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी गायले “वंदे मातरम्”, अंगावर काटा आणणारा Video Viral)
(हे ही वाचा: लग्नात नववधूला हार घालतानाच घसरला नवरदेवाचा पायजमा आणि…; बघा मजेशीर video)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
आजीचा हा नागिन डान्स पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमते. आजीची ही स्टाइल आणि डान्स पाहून लोकही हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ २६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यूजर्स या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “अमेझिंग आजीने तिचे मन जिंकले आहे.”