Viral video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यत सगळेच अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्धीस येईल आणि कोणाची चर्चा होईल सांगता येत नाही. एका व्हिडीओमुळे अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात आलेत. असाच एका आजीचा व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आजी-आजोबांचा तर स्वॅगच वेगळा असतो. आत्तापर्यंत असे लाखो व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यामध्ये वयोवृद्ध लोकं आनंदात डान्स करतात. त्यांच्या या व्हिडिओंवरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, आनंद साजरा करायला, कलेला वयाची मर्यादा नसते. असं म्हणतात की वय वाढलं तरी माणसाचं मन तरुण असलं पाहिजे. आजीचा हा व्हिडीओ बघून याची प्रचिती येते. डान्स करताना आजीचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवणारा आहे. तुम्ही हा व्हिडीओ बघितला, तर तुम्हालाही या आजींचे कौतुकच वाटेल.
अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये एका आजींनं आपल्या भन्नाट डान्स केलाय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. .
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” या जुन्या मराठी गाण्यावर या आजीबाई थिरकल्या आहेत. नुसत्याच थिरकल्या नाहीतर त्यांचे एक्स्प्रेशनही पाहण्यासारखे आहेत.यानंतर आजी भन्नाट अशा स्टेप्स करत डान्स करत आहेत. त्यांच्या एक वेगळाच स्वॅग दिसून येत आहे. सध्या या व्हिडिओने नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याची माहिती नाही. पण हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर uttkeshwani नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे.