बालपण किती निरागस असतं ना! कसली चिंता नाही, कसलंह दडपण नाही….प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा! नुसते खेळायचे अन् मजा मस्ती करायची. लपा-छपी, पकडा-पकडी, विष-अमृत, डोंगर -पाणी, विट्टी-दांडू, फरशीपाणी, शिरापूरी, लगोरी यांसारखे कित्येक खेळ आपण लहान असताना खेळलो आहोत. या खेळांची मजा काही वेगळीच होती बालपणीची दिवस खरचं खूप सुंदर असतात. मोठं झाल्यावर हे दिवस खूप आठवतात. खरं तर मोठं झाल्यावर आपल्याला बालपणची खरी किंमत कळते. पुन्हा एकदा लहान व्हावं आणि ते दिवस पुन्हा जगावे असे प्रत्येकाला वाटते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्या आपलं बालपण पुन्हा एकदा जगत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला लहान मुलांबरोबर खेळताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामवर kokani_vlogger_omkar_01 नावाच्या खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एकाने व्यक्तीने आपल्या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये सहावारी काष्टी नेसलेली वृद्ध महिला लहान मुलांबरोबर खेळताना दिसत आहे. ‘लगोरी’ हा खेळ सर्वजण खेळत आहे. आजी हातात बॉल घेऊन लगोरी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आजीबरोबर मुलं आनंदाने खेळताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

हेही वाचा – “निळ्याशार लाटेला खाकीची सुरक्षा!”, मुंबई पोलिसांनी शेअर केली खास पोस्ट; विराट कोहलीने केले तोंडभरून कौतुक

लोकांना हा व्हिडीओ आवडला असून नेटकऱ्यांनी त्यावर भरपूर कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले,” नातवंड खूप भाग्यवान आहे” दुसरा म्हणाला, “खूप छान व्हिडीओ आहे”

हेही वाचा- आनंद महिंद्रांनी केलं मुंबई महापालिकेचं तोंडभरून कौतूक! विजयोत्सवानंतर अशी झाली होती मरिन ड्राईव्हची अवस्था, पाहा Video Viral

कसा खेळला जातो लगोरी खेळ
लगोरी या खेळामध्ये एका ठिकाणी सपाट दगड एकमेकांवर ठेवले जातात. दोन टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. एक टीम बॉलने दगडांची लगोरी पाडण्याचा प्रयत्न करते. लगोरी पडताच विरोधी टीम पुन्हा ते दगड एकमेकांवर ठेवतात. तोपर्यंत पहिली टीम बॉल घेऊन पुन्हा लगोरी पाडण्याचा प्रयत्न करतात.जर विरोधी टीमने जर लगोरी पुर्ण केली तर जोरजोर लगोरी ओरडतात आणि खेळ जिंकतात.
व्