Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून आपण भावूक सुद्धा होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला आजोबा आणि नातवाचे एकमेकांबद्दलचे प्रेम दिसून येईल. हा व्हिडीओ रेल्वेस्टेशनवरील आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे बालपण आठवेन. (Video : grandpa and grandchild became emotional at Railway Station)
गावी जाताना ढसा ढसा रडत होता नातू (grandchild can’t stop crying as they leave for the village)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसून येईल. रेल्वेस्टेशनवर एक रेल्वे थांबलेली आहे. व्हिडीओत तुम्हाला एक आजोबा दिसतील जे गावी जात असलेल्या नातवाबरोबर रेल्वेच्या खिडकीजवळ उभे राहून बोलत आहे. नातू मात्र ढसाढसा रडताना दिसत आहे. पुढे व्हिडीओ तुम्हाला दिसेल की आजोबा हळूच खिशातून पैसे काढतात आणि नातवाच्या हातात दहा रुपये देतात. नातू ते पसे घेतो पण आणखी रडतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांचे आजोबा आठवतील तर काही लोकांना त्यांचे बालपण आठवेन. काही लोक हा व्हिडीओ पाहून भावूक होतील.
हेही वाचा : “एका साडीसाठी एकमेकींचा जीव घेतील या बाया” भर कार्यक्रमात सुरु झाला कुस्तीचा आखाडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video )
yo_yo_sarvesh91 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रेल्वे स्टेशनवर आजोबा आणि नातवाचा टिपलेला सुंदर व्हिडिओ खरंच डोळ्यातून पाणी आलं.”
हेही वाचा : याला नशीब म्हणाल की आणखी काही? कामगारांवर कोसळल्या गोण्या पण तो एकटाच कसा वाचला? VIDEO चा शेवट एकदा पाहाच
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बाबापेक्षा आजोबा नेहमी जास्त प्रेम करतो. ” तर एका युजरने लिहिलेय, “खरच आठवण आली रे दादा …ते १० रुपये पण लाखा पेक्षा मोठे वाटायचे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजोबा -नातवाच वेगळंच नात असतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “ते २०-५० रुपये खूप मोलाचे होते यार.” एक युजर लिहितो, “आजोबा नातवंच शेवटचा मित्र” तर एका युजरने लिहिलेय, “खरचं, लहानपणीचे दिवस आठवले.” अनेक जण व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.