वाढत्या वयानुसार वयस्कर व्यक्तींना आधाराची गरज असते. हा आधार शारीरिक तसेच मानसिक असतो. त्यातच जर त्यांचा जोडीदार त्यांच्या बरोबर असेल तर हे जोडपेच एकमेकांचा आधार बनते. आयुष्यातील अनेक वर्ष या वृद्ध जोडप्याने एकत्र पाहिलेली असतात. त्यामुळेच एकमेकांची सोबत असणेच त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक असते. सध्या एका वयस्कर जोडप्याचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही भावुक व्हाल.

सोशल मीडियावर वयस्कर जोडप्यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळेच भावुक होतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका आजींनी आपल्या लग्नातील पोशाख परिधान केल्याचे आपण पाहू शकतो. यानंतर या कपड्यांमध्ये आपल्या पत्नीला पाहून आजोबांनी जी रिअ‍ॅक्शन दिली आहे, ती तुफान व्हायरल झालीय.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म

लग्न ही गोष्ट प्रत्येकासाठीच खास असते. आपल्या लग्नातील पोशाख बरेचजण नीट सांभाळून ठेवतात. काही समारंभाच्या वेळी हा पोशाख पुन्हा परिधान केला जातो. सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये असणाऱ्या आजींनीही आपल्या लग्नातील पोशाख घातला आहे. यावेळी त्या सोफ्यावर बसून आपल्या पतीची वाट आहेत आहेत. त्याचे वयस्कर पती किचनमधून बाहेर येतात. आपल्या पत्नीला त्या वेशात पाहून आजोबा थक्कच होतात. यानंतर लगेचच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण पाहू शकतो. व्हायरल झालेला हा व्हिडीओ सगळ्यांनाच खूप आवडला आहे.

Viral : ‘हीच खरी मजा!’ बर्फाळ डोंगरावर घसरगुंडी खेळणाऱ्या गायीचा Video पाहून नेटकरी झाले खुश

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ४१ लाखांहुनही अधिक लोकांनी लाइक केला आहे. तसेच यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एक युजरने म्हटलंय, “या आजी-आजोबांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. अनेक लोक हा क्षण जगण्यासाठी तरसतात.”

Story img Loader