लग्न हे आयुष्यभराचे नाते असतं असे म्हणतात पण, आयुष्यभर साथ देणारे जोडीदार फार कमी लोकांना भेटतात. आयुष्यात कितीही संकट आले तरी साथ सोडत नाही तो खरा जोडीदार. असा जोडीदार मिळण्यासाठी खरोखर भाग्य लागते. अशाच आयुष्यभर नातं जपणाऱ्या एका वयस्कर जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमधील हे आजी-आजोबा साठावा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका वयस्कर जोडप्याचे लग्नाच्या साठाव्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्न केले आहे. गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून, पारंपारिक वेषभूषा परिधान केली आहे. सुरकतलेला चेहरा थरथरते. हात आणि पांढरे केस असलेल्या आजी-आजोबांचा लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. आजी आजोबांचे कुटुंबिय उत्साहात त्यांचा लग्न सोहळा साजरा करत आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
हेही वाचा – Pune Video : यंदा दगडूशेठ मंदिराच्या सजावटीसाठी साकारले आशियातील सर्वात उंच जटोली शिवमंदिर, पाहा Viral Video
व्हिडिओ aayuuuu02 आणि jadish.dalvi नावाच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा (Happy 60 Anniversary Aai Baba)”
व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, खूपच छान, व्हिडिओ पाहून मन भरून आले. एका सेकंदासाठी वाटले आपण कमीत कमी ५० वर्षापर्यंत पोहचू या. आम्ही दोघांनी ३ वेळा पाहीला.”
दुसरा म्हणाला की, “हे कमाल होत बाकी, तो क्षण आणि त्या जाग्या झालेल्या जुन्या आठवणी”
तिसरा म्हणाला की, “हे कुटुंब असचं निरंतर प्रेमाने राहो”
चौथा म्हणाला, “खूप छान, असा व्हिडिओ मी आतापर्यंत पाहिला नाही.”
पाचवा म्हणाला की, आम्हा लहान मुलांच्या आशीर्वाद लागो आजी-आजोबांना”
सहावा म्हणाला की, “खुप छान पहिल्यांदा असा व्हिडिओ पाहिला अस सर्व मुलानी आपल्या आई वडिलांना साठी केल पाहिजे लग्नाच्या साठाव्या वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. आजी आजोबा तुम्हाला देव तुम्हाला असेच नेहमी आनंदात सुखात ठेवो हीच प्रार्थना आहे.