आजी-आजोबांचं त्यांच्या नातवंडावर जीवापाड प्रेम असतं, मग भले ते जवळ राहायला असो की नसो. लाडक्या नातवंडाचा प्रत्येक हट्ट पुरवण्याचा प्रयत्न ते करतात. सुट्टीत गावी आले की आजी आजोबा त्यांचे भरपूर लाड करतात आणि कधी आजी-आजोबात शहरात लेकाच्या -लेकीच्या घरी गेले तर नातवंडासाठी भरपूर खाऊ घेऊन जातात. यालाच तर आजी-आजोबांचे प्रेम म्हणतात. असाच काहीसा प्रसंग सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एका आजी-आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये नातवडांच्या आवडीच्या वस्तू घेऊन जाताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे एक वृद्ध जोडपं लोकलमधून प्रवास करत आहे. गावाहून शहरात जाताना त्यांनी स्वत:सह भरपूर सामान घेतले होते. त्यात आळूच्या पाने देखील दिसत आहे. आजी-आजोबा हे सामान त्यांच्या पिशव्यांमध्ये बसवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हे पाहून जेव्हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने त्यांना विचारले की, “तुम्ही इतकं सामान का घेऊन आला आहात.” तर उत्तर देत ते म्हणाले, “हे सर्व ते नातवंडासाठी घेऊन जात आहे.”
हेही वाचा – रेल्वेमध्ये प्रवास करताना कधीही ‘ही’ चूक करू नका, नाहीतर तुमच्याबरोबरही…; थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ RVCJinsta या अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आजी-आजोबांचे निस्वार्थ प्रेम!” लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. अनेकांच्या बालपणीच्या आठवणी या व्हिडीओने जाग्या केल्या आहेत. व्हिडीओवर लोकांनी भरपूर कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा – हे भन्नाट आहे राव! महिलेने पर्समधून बाहेर काढली हटके सायकल, चिमुकलीला बसवलं अन्….पाहा व्हायरल VIDEO
एकाने लिहले, “ही शेवटची पिढी असेल ज्यांना प्रेमाचा खरा अर्थ माहीत आहे.” दुसऱ्या व्यक्तीने लिहले की, हे निस्वार्थी प्रेम असतं, “मला त्यांची अजूनही आठवण येते.” तिसऱ्याने लिहले, “नातवडांना पाहून त्यांना त्यांच्या मुलांचे बालपण आठवते आणि तो काळ त्यांना पुन्हा जगायचा असतो.”