Viral Video: आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्यातील उबदार नातं अगदी जगावेगळं आहे. आजी-आजोबांपासून ते नातवंडांपर्यंत हे तीन पिढ्यांचं घट्ट बंधन घर टिकवून असतं. आज धावपळीच्या जीवनात आई-बाबा कामाला जातात तेव्हा या नातवंडांना सांभाळायची जबाबदारी ही आजी-आजोबांवरच असते. आजी-आजोबा त्यांच्या मुलांना, घराला व स्वतःच्या नात्यालाही जपताना दिसतात हे पाहून प्रत्येकाला नवल वाटतं आणि तुमची पिढीच बेस्ट आहे, असं अनेकदा प्रत्येकाच्या तोंडून निघतं. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात आजी-आजोबांची प्रेमकहाणी एका नातवानं सांगितली आहे, जे पाहून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.

व्हिडीओची सुरुवात अनिशच्या आजी-आजोबांची प्रेमकहाणी सांगताना होते; ज्यांच्या लग्नाला ६० वर्षं झाली आहेत. अनिशच्या म्हणण्यानुसार- हे जोडपं नेहमीच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करतं. मात्र, या वर्षी आरोग्याच्या समस्येमुळे आजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच दोघेही लांब असूनही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघांनाही एकमेकांना भेटवस्तूची देवाणघेवाण करायची होती. आजी-आजोबांनी एकमेकांना काय भेटवस्तू दिली हे तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल

हेही वाचा…दिल तो बच्चा है जी! ओपन जिममध्ये नागालँडचे मंत्री तेमजेन करतायत व्यायाम; पाहा मजेशीर VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हॉस्पिटलमध्ये भेटवस्तू अनिशच्या आजीची प्रतिक्रिया अनमोल होती आणि तिने रुग्णालयातील कर्मचारी (नर्स) यांच्याबरोबर केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा केला व त्या बदल्यात आजीने आजोबांना पुष्पगुच्छ पाठवला. त्यानंतर ३० दिवसांनी जेव्हा आजी हॉस्पिटलमधून परत घरी येते तेव्हा आजोबा तिला मिठी मारून तिचे स्वागत करतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @anishbhagatt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘मी या पिढीत का जन्मलो…, असे दुःख व्यक्त करीत अनिशने कॅप्शन दिली आहे. तसेच आजी-आजोबांची खास प्रेमकहाणी व्हॉइस-ओव्हरद्वारे सांगितली आहे ; जे पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल.

Story img Loader