Viral video: आजी म्हणजे काय दुधावरची साय, आजी म्हणजे काय आपल्या आईवडिलांची आय. आजी म्हणजे नातवंडाबरोबर रमणारी त्यांच्यावर प्रेम करणारी, सुरकुतलेल्या हातांनी मायेने आपल्या कवेत घेणाऱ्या अशाच एका आजीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही रडवणारे. सध्या समोर आलेला व्हिडीओ हा आजी आणि नातवाचा आहे. आजी आणि नातवंडांमधलं नातं या व्हिडीओमधून समोर आलं आहे.

नातवानं आजीला दिलेलं सरप्राईज आणि आजीचा आनंद सगळंच पाहण्यासारखं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कारमध्ये नातू आजी निवांत गप्पा मारत बसले आहेत. तंत्रज्ञान किती पुढे गेलं आहे, आपल्यासाठी हे कॉमन असलं तरीही गावाकडच्या आजी-आजोबांसाठी काही गोष्टी खूप नवीन असतात. छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांना मोठं कुतुहल असतं. असंच या आजीच्या बाबतीत झालं.

Improved Energy Levels doctor suggest some hacks
Improved Energy Levels : ऊर्जा, तणाव, झोप ‘या’ गोष्टींवर नियंत्रण कसं ठेवाल? फक्त हे तीन उपाय करा; समजून घ्या डॉक्टरांचा सल्ला…
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
All about the 150-second walking workout to burn calories Walking workout tips
Walking workout: तुम्हालाही घरात राहून कॅलरीज बर्न करायच्या आहेत का? डॉक्टरांनी सांगितला अवघ्या १२० सेकंदाचा व्यायाम
Childs Hilarious Response to 'Where Were You at Your Parents' Wedding?'
“मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याने दिले भन्नाट उत्तर, Video होतोय व्हायरल
after controvrcial remark on rahul gandhi bonde said in sense my statement makes mother angry with child
नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “
Lemons Really Help With Acidity?
तुम्हाला पित्ताचा त्रास आहे का? मग आहारात लिंबाचं सेवन करा अन् आराम मिळवा
ganpati naivedya recipes how to make badam poli prasad recipe
Naivedya Recipes: बाप्पाच्या प्रसादाला बनवा बदाम पोळी; सोपी रेसिपी लगेच नोट करा
Ukdiche Modak Recipe
Ukdiche Modak : उकडीचे मोदक फुटतात? टेन्शन घेऊ नका, या टिप्स जाणून घ्या अन् बनवा स्वादिष्ट मोदक

VIDEO पाहून तुम्हालाही येईल आजीची आठवण

तरुण कारमध्ये पुढच्या सीटवर बसला आहे तर आजी मागच्या सीटवर बसली आहे. यावेळी नातू आजीला कारचं सनरुफ ओपन करुन दाखवतो. ते पाहून आजीला खूप वेगळे वाटते, पहिल्यांदाच एखादी अनोखी गोष्ट पाहिल्यासारखं आजी वर पाहत राहते. यावेळी नातवाच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्वकाही सांगून जातो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! चाकं नसलेल्या बाईकची रस्त्यावर सुसाट एन्ट्री; Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @sidkorade या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. तर अनेकांना व्हिडीओ पाहून आपल्या आजीची आठवण आली.