आजही आपल्या खेड्या पाड्यात प्रवासाला निघताना नारळ फोडण्याची किंवा हार फुलं रस्त्याला वाहण्याची प्रथा आहे. समुद्र किंवा नदी मार्गाने प्रवास करताना श्रद्धा म्हणून अनेक जण नाणी देखील नदीच्या पात्रात टाकायचे. ही पद्धत आजही अनेक गावात असेल. पण या गोष्टी कधी आणि कुठे करायला या प्रत्येकाला ठावूक असलं पाहिजे नाहीतर चीनमधल्या आजींसारखी गत व्हायची. या आजींनी सुदैवासाठी म्हणजे गुड लकसाठी चक्क विमानाच्या इंजिनमध्ये नाणी फेकली. ८० वर्षांच्या या आजी आपल्या सूनेसोबत चायना साऊदर्न एअरलाईन्सने प्रवास करत होत्या. विमानात चढताना कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे दहा एक  नाणी त्यांनी इंजिनमध्ये फेकली.

वाचा : ब्रेसलेटची किंमत ऐकून महिला दुकानातच बेशुद्ध पडली

जेव्हा विमान टेक ऑफ करण्याच्या आधी सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांना इंजिनमध्ये नाणी सापडली. कर्मचाऱ्यांनी ही नाणी बाहेर काढली. आजींच्या या प्रतापामुळे विमानाला इच्छित स्थळी पोहोचायला पाच तास उशीर झाला. जर हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती. विमानातल्या प्रवाशांच्या जिवावरही बेतलं असतं तेव्हा समस्त प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासाठी या आजींना विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी अटक केलीय.

Viral Video : शाळेत मोबाईल आणणाऱ्या मुलांना अशी घडवली जाते अद्दल

Story img Loader