उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे प्रकरण जेवार भागातील आहे जिथे एका जोडप्याने आपल्याच नातेवाईकाला काठीने मारहाण केली आणि त्याची स्कूटरही फोडली. पीडित गजेंद्रच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जुगेंद्र आणि त्याच्या पत्नीला अटक करून तुरुंगात पाठवले.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आधी एक तरुण एका दिव्यांग व्यक्तीला काठीने बेदम मारहाण करतो, त्यानंतर एक महिलाही काठी आणते आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात करते. स्कूटरवर बसलेल्या अपंग व्यक्तीला पळूनही जाता येत नव्हतं.
हा व्हिडीओ २७ मार्चचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये गजेंद्र या दिव्यांग तरुणाला त्याच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. खरं तर आरोपी जुगेंद्रने दिव्यांग व्यक्ती गजेंद्रला त्याची शाळा चालवण्यासाठी दिली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. हे पाहता जुगेंद्रने शाळा भाड्याने घेतली. या प्रकरणावरून जुगेंद्र आणि गजेंद्र यांच्यात वाद झाला..भांडण इतके वाढले की, रागाच्या भरात जुगेंद्रने पत्नीसह गजेंद्रला मारहाण केली आणि त्याची स्कूटरही फोडली.
आणखी वाचा : ट्रिपवरून परतलेल्या मालकाला पाहून कुत्र्याने मारली मिठी, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरीबाई…नवऱ्यासमोर कुण्या दुसऱ्यासोबतच करू लागली डान्स
अतिरिक्त डीसीपी विशाल पांडे यांनी सांगितले की, पीडित गजेंद्रने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर दोन्ही आरोपी पती-पत्नीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : दुकानदारावर फिदा झालेल्या ग्राहकाने दिले ३८ हजारांचे बक्षीस
दिव्यांगसोबत झालेल्या मारहाणीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, “या द्वेषाच्या युगात आपण कोणत्या टप्प्यावर उभे आहोत. याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. ही दृश्ये मानवतेला लाजवणारी आहे.”