टोल नाक्यावरील वाद काही नवीन नाही. नेहमीच हा टोलनाका वादाच्या भोवऱ्यात असतो. सतत चर्चेत असणाऱ्या या टोल नाक्यावर मारामारीचा प्रकार घडला आहे. टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल कर्मचारी महिला यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आहे. या मारामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्रेटर नोएडा येथील टोल प्लाझा येथे एका महिलेने महिला टोल कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लुहारली टोलनाक्यावर टोल टॅक्स न भरता वाहन बाहेर काढल्याने एका महिलेने केबिनमध्ये घुसून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले.

एका महिलेने टोलनक्यावरील महिला कामगाराला मारहाण केली. टोल बुथवर उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्याने तिला ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. मात्र तिने कोणताही ओळखपत्र न दाखवल्याने गाडीतील महिलेने खाली उतरून महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली. स्वत: बॅरिकेड तोडून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी टोल व्यवस्थापकाने दादरी कोतवाली येथील एका अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे..

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून

पाहा व्हिडीओ

VIDEO: हिऱ्याची अंगठी रूतून बसली! बोट कापून आत शिरली अंगठी, व्यक्तीची अवस्था पाहून अंगावर येईल काटा…

त्याचवेळी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वाहन क्रमांकावरून महिला आणि पुरुषाचा शोध घेतला आणि त्यानंतर महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. टोलवरून भांडणाचा हा पहिला व्हिडिओ नाही. यापूर्वीही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Story img Loader