दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय अनेकदा तुम्हाला आला असेल. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ निघू शकतो. या ऑप्टीकल इल्यूजनमुळे अनेकदा गोंधळ उडतो. अशाच एका व्हिडीओची सध्या इंटरनेटवर चर्चा सुरु आहे. सध्या नेटकरी रंग बदलणाऱ्या टोपीचा व्हिडीओ पाहून या टोपीचा रंग कोणता ? यावरून यावरुन चर्चा करत आहेत. ही टोपी हिरव्या रंगाची असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे तर काही जणांनी ही टोपी तपकिरी रंगाची असल्याचं व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर सध्या रंग बदलणाऱ्या टोपीचा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सुरूवातीला तुम्ही गोंधळून जाल. हा व्हिडीओ पाहून ठरवणं अवघड होतंय की यातल्या टोपीचा रंग नेमका कोणता ? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओन नेटकऱ्यांना चांगलंच कोड्यात पाडलंय. काहींनी या व्हिडीओमध्ये निळी टोपी पाहिली, तर अनेकांनी काळी टोपी पाहिली आहे. इतरांना तर अजून खात्री पटलेली नाही ती टोपी नक्की पांढरी आहे की सोनेरी आहे?

टिकटॉक युजर ओटेलिया कारमेनने अलीकडेच या टोपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टोपी रंग काही सेकंदात बदलून तो लाल रंग होतो, कधी तपकिरी तर कधी हिरव्या रंगात बदलते आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी कमेंट करुन या व्हिडीओवर आपलं मत नोंदवलं आहे. गेल्या तीन दिवसात हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून अनेकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

तुम्हाला काय दिसतंय ?
या व्हिडीओमध्ये हातात ही तपकिरी रंगाची टोपी पडकल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर ही टोपी आणखी वेगळ्या दिशेने फिरवली की तिचा रंग बदलून चॉकलेटी रंगाची होते. पुन्हा ही टोपी हलवली की पहिल्यासारकी तपकिरी रंगाची होऊन काही सेकंदात काळी आणि त्याच्या पुढच्या काही सेकंदात हिरव्या रंगाची होते. पण भ्रम तेव्हा होतो जेव्हा अचानक हा व्हिडीओ पाहाल. पण जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ निरखून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, हा प्रकाशाचा खेळ आहे. याला ‘मेटामेरिझम’ असं म्हणतात.

आणखी वाचा : पाण्याऐवजी फॅंटामध्ये बनवली मॅगी, VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “जगाचा अंत जवळ आलाय”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चोरटा सायकल चोरण्यासाठी घरात घुसला…पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही !

काय आहे ‘मेटामेरिझम’ ?
दोन भिन्न रंग भिन्न प्रकाश स्रोताखाली पाहिल्यास किंवा त्यांचा परिसर वेगळा असल्यास भिन्न दृश्य संवेदना तयार होत असतात. या रंगांना म्हणतात मेटामेट्रिक. एखाद्या विशिष्ट रंगाच्या प्रकाशाखाली वस्तूच्या मुळ रंगात बदल होऊन दोन समान रंगांचे वेगवेगळे रंग दिसून येतात. प्रत्येका प्रकाशाचा एक ठराविक रंग असतो. त्यातील प्रत्येक रंगाला ठराविक तरंग लांबी असते. प्रकाशातील या सातही रंगांची त्यांच्या तरंग लांबींनुसार जागा ठरते. त्यामुळे विशीष्ट रंगाच्या प्रकाशात वस्तूच्या मुळ रंगावर परिणाम होऊन तो बलदतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. लोक अजुनही टोपीचा रंग नेमका कोणता यावर ठाम उत्तर देऊ शकलेले नाहीत. हा व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि हे असं कसं असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय.