वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. कोणत्या ना कोणत्या कामनिमित्त लोकांना घराबाहेर पडावे लागत आहे. दरम्यान, नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पुद्दुचेरीच्या प्रशासनाने हटके जुगाड शोधून काढला आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुद्दुचेरीमधील हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर पुणेकरांनी देखील पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे पुण्यातही ही सुविधा करण्याची मागणी केली आहे. पण नक्की हा जुगाड काय आहे ज्याची सोशल मीडियावर इतकी चर्चा होत आहे हे आधी जाणून घेऊ या…
पुद्दुचेरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) शहरातील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलजवळ हिरव्या कापडच्या जाळ्या बांधल्या आहेत. जेणेकरून ट्रॅफिक सिग्नलला थांबणाऱ्या नागरिकांना सावली मिळेल आणि उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार नाही. या उपक्रमामुळे सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना, जयरामचंद्रन या एक्स वापरकर्त्याने ट्रॅफिक सिग्नलवर रस्त्यावर या हिरव्या जाळ्या लावल्याचे दर्शवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या उपक्रमाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
हेही वाचा – १९९१ मधील चांदणी चौकचा Viral Video पाहून पुणेकरांच्या आठवणी झाल्या जाग्या, म्हणे, “हरवलं सगळं ते आता”
व्हायरल व्हिडीओमध्ये या हिरव्या जाळीमुळे दुचाकीस्वारांना थंड हिरव्या सावलीत आश्रय घेता येत आहे आणि ट्रॅफिक सिग्नलची धीराने वाट पाहताना दिसत आहे.
@Jayaram9942Blr या खात्यावरून ऑनलाइन व्हिडीओ शेअर केल्यापासून, X वर १ लाखांहून अधिक व्ह्यूजसह व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
“तिथे एक युक्ती पहा. पादचारी क्रॉसिंगच्या काही १० फूट आधी सावली थांबते. किमान कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी, वाहनचालक पादचाऱ्यांना अडवणार नाहीत,” असे एका वापरकर्त्याने सांगितले. “चांगला उपक्रम आणि धन्यवाद की कोणीतरी हा विचार केला,” दुसऱ्याने लिहिले.
“झाडे लावा, तुम्हाला या प्लॅस्टिकच्या पत्र्यांची गरज भासणार नाही” असे म्हणत आणखी एका वापरकर्त्याने शहरात अधिकाधिक झाडे लावण्याचा सल्ला दिला.
सात दिवसांच्या हवामान अंदाजानुसार, पुद्दुचेरीमध्ये शुक्रवारी तापमान २८ अंश सेल्सिअस, शनिवारी ३० अंश सेल्सिअस, रविवारी २९ अंश सेल्सिअस, सोमवारी २९ अंश सेल्सिअस, मंगळवारी २९ अंश सेल्सिअस, मंगळवारी २८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. बुधवारी आणि गुरुवारी २९ अंश सेल्सिअस इतके होते. वाढत्या तापमानामुळे हैरान नागरिकाना दिलासा देण्यासाठी पुद्दुचेरी सार्वजनिक बांधकाम विभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांनी पुणे महापालिका प्रशासनाला पुण्यात असा उपक्रम राबविण्याची विनंती केली.
इंस्टाग्रामवर instapuneofficial नावाच्या पेजवर पुद्दचेरीमधील व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”पीएमसी पुणे पुणे सिटी सिग्नलमध्ये याची अंमलबजावणी का करत नाही. यामुळे सिग्नलवर वाट पाहणाऱ्या वापरकर्त्यांना झेब्रा क्रॉसिंग आणि सावलीचा अधिक चांगला वापर करण्यास मदत होईल.” अनेक पुणेकरांनी या मागणीबाबत सहमती दर्शवली आहे.