राज्यात सध्या पावसाच्या सरी सगळीकडे बरसत आहे. पाऊस शहरात चांगलाच बॅटिंग करतोय. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं बघायला मिळालंय. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. पावसाळ्यात याबाबतच्या होणारा त्रास नेहमीचाच असताना नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार अतिशय किळसवाणा आहे.एका भाजीपाला विक्रिकेत्याचा व्हिडीओनं खळबळ माजवली आहे. भाजी विक्रेत्यानं चक्क नाल्याच्या पाण्यात भाजी धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किळसवाणा प्रकार…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा भाजीविक्रेता त्या नाल्यात टोमॅटो, मिरच्या आणि इतर अनेक भाज्या टाकून त्याची साफसफाई करताना दिसतो. आधी हा भाजीविक्रेता टोमॅटो आणि कोबी त्या नाल्यातील घाण पाण्याने धुवून उरलेल्या भाज्यांसह हातगाडीवर टाकतो. या नाल्यात हिरवी मिरची, कोबी आणि इतर अनेक प्रकारच्या भाज्याही आहेत. ही घटना महाराष्ट्रातील भिवंडी येथील आहे. या प्रकरणी आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मांजर पाळताय? सावधान! मांजराचा मालकावर जीवघेणा हल्ला; Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पावसामुळे विविध प्रकारचे आजार डोके सुद्धा वर काढत आहे. अशातच भाजी विक्रेत्याकडून नालीत भाजी धुवून विक्री करणे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखं प्रकार आहे. हा खळबळजनक व्हीडिओ हजारो नागरिकांनी पहिला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नजरेआड असा किळसवाणा प्रकार सुरू असेल असं नागरिकांनी गृहीत धरलं नसेल. मात्र अचानक हा व्हिडिओ नागरिकांसमोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green vegetables tomato being washed in sewage water video viral on social media users get angry srk