लग्नसोहळा प्रत्येकासाठी खास असतो. तो आणखी खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात रहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. आपल्या जोडीदारासाठी अनेकदा नवरा बायको खास डान्स करतात. सोशल मीडियावर अनेकदा या लग्नसोहळ्यातील डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक वरातीतला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक नवरदेव वरातीत अगदी आनंदात जबरदस्त डान्स करताना दिसतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वराचा आणि वधूचा धमाकेदार डान्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल. या व्हिडीओमध्ये नुकतेच लग्न झालेले नवरा आणि बायको त्यांच्या वरातीत दिलखुलास डान्स करताना दिसतायत. रथावर उभं राहून अगदी जल्लोषात दोघं त्यांचा खास दिवस साजरा करताना दिसतायत. सासरी जाण्यापूर्वी नववधूदेखील अगदी आनंदाने, उत्साहाने आपल्या जोडीदाराबरोबर थिरकताना दिसतेय. व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर त्यांचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा… याला म्हणतात संस्कार! हनुमान चालिसा ऐकताच बाळाने केली आईच्या गर्भात हालचाल, सोशल मीडियावरील सर्वात सुंदर VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @unaad_lekru या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “याला म्हणतात ३६ चे ३६ गुण जुळणे”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.३ मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… “गरीब होणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे”, हातगाडीचा जागीच झाला चुराडा अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “वाईब मॅच झाली पाहिजे बस”, तर दुसऱ्याने “लय भारी डान्स” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “ऑडियन्स शॉक.”

दरम्यान, याआधीही लग्नातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, परंतु, सध्याचा हा व्हिडीओ जरा जास्तच चर्चेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom and bride dance in baarat went viral on social media dvr