Groom And Bride VIral Video : गुलाबी थंडी सुरु असतानाच आता लग्न सराईचा सीजनही सुरु झाल्याने नवरा नवरीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्न मंडपात चित्रविचित्र गोष्टी करून नवरी नवरी वऱ्हाडी माणसांनाही आश्चर्याचा धक्का देतात. कधी डीजेच्या तालावर थिरकतात, तर कधी स्टेजवरच रोमॅंटिक होऊन सर्वांच्या भुवया उंचावतात. अशीच एक धक्कादायक घटना एका लग्नसोहळ्यात घडली. स्टेजजवळ असलेल्या मित्रांनी चॅलेंज दिल्यावर नवरा भर लग्नमंडपात नवरीसोबत रोमॅंटिक व्हायला गेला अन् स्वत:ची फजितीच करुन बसला. हा संपूर्ण मजेशीर प्रकार कॅमेरात कैद झाल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मित्रांनी दिलेलं चॅलेंज स्विकारलं आणि स्टेजवरच नवरा-नवरीची झाली फजिती

लग्न मंडपात स्टेजवर नवरीला वरमाला घालायला गेल्यावर नवऱ्याला विचित्र बुद्धी सुचल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. स्टेजजवळ असलेल्या मित्रांनी दिलेलं चॅलेंज स्विकारणं या नवऱ्याच्या चांगलच अंगटल आल्याचं दिसत आहे. रोमॅंटिक झालेला नवरा स्टेजवर नवरीला उचलून घ्यायला जातो पण क्षणातच ते दोघेही खाली पडतात. नवऱ्याला नवरीला उचलून घेता न आल्याने त्याची चांगलीच फजिती होते. हा मजेशीर व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाहीत. नवऱ्याने केलेला भन्नाट प्रकार नवरीलाही आवडला नसेल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओला दिल्या आहेत. हसना जरुरी है नावाच्या युजरने हा मजेशीर व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

नक्की वाचा – Viral Video: हीच खरी बाहुबली! साडी नेसलेल्या तरुणीने GYM ट्रेनरलाही फोडला घाम, ट्रॅक्टरचा चाक डोक्यावर उचलून भन्नाट स्क्वाट्स मारल्या

इथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर नवरा नवरीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने या व्हिडीओला आतापर्यंत ११ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. लग्न सराईचा सीजन असल्याने काही ना काही विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्न काही जण करतात आणि सोशल मीडियावर ट्रोल होतात. एरव्ही वऱ्हाडी मंडळी डीजेच्या तालावर नाचताना आपल्याला व्हिडीओंच्या माध्यमातून दिसते. पण आता तर चक्क नवरा नवरीही भर लग्नमंडपात रोमॅंटिक होऊन रील्स बनवताना दिसतात. लग्नातील अशाप्रकारचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांचंही जबरदस्त मनोरंजन झाल्याशिवाय राहत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom and bride in marriage ceremony romantic video went viral on twitter couple fell down in front of all guest nss