Viral Video: सोशल मीडियावर लग्नातील व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. यामधील काही व्हिडीओंमध्ये लग्नातील धम्माल, मस्ती, गाणी, डान्स वगैरे पाहायला मिळते तर काही व्हिडीओ हे गंभीर स्वरुपाचे असतात. लग्नातील एखाद्या अपघाताचे वगैरे. लग्नामध्ये नवरदेव आणि नवरी एकमेकांना हार घालताना अनेक प्रयोग करत असतात. गळ्यात हार घालताना त्यांना उचलून घेतलं जातं, त्यामुळे हार घालताना नवरीला परत कुणीतरी उचलून घेतं. नवरीला उचलून घेऊन फोटोग्राफीही केली जाते. असे अनेक प्रयोग लग्नाच्या कार्यक्रमात केले जातात. तर आत्ता एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या एक वेगळाच व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून हसावं की रडावं हेच तुम्हाला कळणार नाही. यामध्ये नवरदेवाचा अतिउत्साह त्याच्या चांगलाच अंगलट आलाय.

सध्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्न झाल्यानंतर फोटोशूट करतेवळी नवरा नवरीला उचलून घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचा हा अतिउत्साह त्याच्या चांगलाच अंगलट आलाय. कारण नवराला उचलताना दोघेही पडले. खाली पडले. मित्रांच्या सांगण्यावरून नवरीला दोन्ही हातात उचलून घेताना तीन वेळा प्रयत्न केला. परंतू नवऱ्याचा तोल गेला आणि दोघेही खाली पडले. हा व्हिडिओ फार जूना असला तरी आता तुफान व्हायरल होत आहे. इंटरनेट वरील काही व्हिडिओ आपल्याला पोट भरुन हसवतात.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच

या नवरदेवामध्ये एवढा कॉन्फिडन्स कसा अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – रुग्णालयाचा भोंगळ कारभार! चक्क सुरक्षा रक्षकाने रुग्णाला दिले इंजेक्शन, Video पाहताच संतापले नेटकरी

@HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. लग्नातील अशाप्रकारचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांचंही जबरदस्त मनोरंजन झाल्याशिवाय राहत नाही.

Story img Loader