Pre Wedding Shoot Groom And Bride Video : लग्न सराईचा सीजन सुरु झाल्याने नवरा-नवरीचे एकाहून एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. भर लग्नमंडपात नववधू थिरकतानाचे व्हिडीओही समोर आले आहेत. वऱ्हाडी मंडळींच्या समोर हिरोगीरी करणाऱ्या नवऱ्याचीही फजिती झाल्याचं इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. लग्नमंडपात भन्नाट डान्स करून व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांना चक्रावून ठेवणारे नवरा-नवरी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. कारण लग्नसोहळ्यात वेडिंग शूट सुरु असताना नवरी-नवरीने जबरदस्त रोमॅंटिक पोज दिल्याचा व्हिडीओही तुफान व्हायरल झाला आहे. नवरीने रोमॅंटिक होऊन नवऱ्याला घट्ट पकडल्याचं या व्हिडीओत दिसत आहेत. त्यांच्या या रोमॅंटिक अदा कॅमेरात कैद होऊन व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवरीने नवऱ्याच्या गळ्यात हात टाकून रोमॅंटिक पोज दिली, त्यानंतर….

व्हायरल झालेल्या या प्री वेडिंग शूटच्या व्हिडीओत नवरा-नवरी फोटोग्राफरला नवनवीन स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहेत. नवरीने नवऱ्याच्या गळ्यात हात टाकून रोमॅंटिक पोज दिल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. नवरीने डोळे बंद करून मान मागच्या बाजूला केली आहे. याचदरम्यान नवरा नवरीला रोमॅंटिक मूडमध्ये पाहताना व्हिडीओत दिसत आहे. नवरीचा हा जबरदस्त अंदाज इंटरनेटवर तमाम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आयपीएस अधिकारी विजय सिंह गुर्जर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 475 k एव्हढे व्यूज मिळाले आहेत. तर शेकडो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

नक्की वाचा – Video: दुचाकीवरून आई-वडील खाली पडले, पण टाकीवर बसलेला लहान मुलगा अर्धा KM पर्यंत तसाच पुढे जातो अन्…

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं “जीवघेणा स्टंट.” दुसरा नेटकरी म्हणाला, कुठून कुठून नवीन गोष्टी घेऊन येत आहेत. संवेदनशीलता आहे की नाही? सर्व बुद्धी रोबोटला कमांड देण्यासारखी आहे.” अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ” यामुळेच लग्नानंतर जीवन फिल्मी होऊन जातं.” या नवरा नवरीचा रोमॅंटिक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांचाही जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नवरा नवरीचे रोमॅंटिक व्हिडीओ सोशल मीडियावर दिवसेंदिवस व्हायरल होतान दिसत असून लोकांचंही मनोरंजन होत आहे.

Story img Loader