Groom Entry In Wedding: लग्नामधील खरं आकर्षण म्हणजे नवरा आणि नवरीच्या एन्ट्रीचे असते. लग्नात आपली एन्ट्री प्रभावशाली असावी असं अनेकांना वाटतं असत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये नवरा आणि नवरीची धमाकेदार एन्ट्री दिसून येते. पण तुम्ही कधी नवऱ्याला पाळीव प्राण्यासोबत एन्ट्री घेताना पाहिलंय का? होय, सध्या याच नवरदेवाच्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्यामध्ये नवरदेवाने चक्क पाळीव कुत्र्यासोबत बाईकवरून लग्नात एन्ट्री केली आहे.
नवऱ्याची कुत्र्यासोबत धमाकेदार एन्ट्री
व्हायरल व्हिडिओमध्ये शेरवानी घातलेला नवरा आपल्या पाळीव कुत्र्यासोबत बाईकवरून एन्ट्री घेताना दिसत आहे. लॅब्राडोर जातीचा हा कुत्रा असून तो ही क्षणाचा आनंद घेत आहे. लग्न असल्यामुळे या कुत्र्याला देखील शेरवानी घालण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर दर्शन नंदू पॉल नावाच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये ‘Like a boss’ असे लिहिले आहे.
नवरदेवाची अशी धमाकेदार एन्ट्री तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल. हा व्हिडिओ नक्कीच तुमचे मन जिंकेल.
( हे ही वाचा: Video: दिल्लीतील भररस्त्यात ‘पानी दा रंग’ गाणे गात होता तरुण; अचानक आयुष्मान खुराना त्याच्या समोर आला अन्…)
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: Video: ‘या’ पक्षाची हिंमत तर बघा, चक्क मधमाश्यांच्या पोळ्यावर केला हल्ला अन् तितक्यात…)
हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ अपलोड झाल्यापासून आतापर्यंत या व्हिडीओला २.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच लोक यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. एकाने लिहिलंय “इंटरनेटवरील आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडीओ” तर दुसऱ्याने म्हटलंय, ” प्रत्येक कुत्र्याला असं कुटुंब मिळायला हवं”