Dowry Shocking Case: संपूर्ण देशात हुंडाबंदीचे कठोर नियम असतानाही अनेकदा हुंड्यामुळे अजूनही अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. अलीकडेच असाच एक प्रकार समोर आला पण यात हुंडा मागितलेल्याचीच दया यावी अशी अवस्था करण्यात आली आहे. दौसा येथील लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्राप्त माहितीनुसार, नवरदेवाने वधूपक्षाकडे हुंड्यात एक गोष्ट मागितली होती यानंतर या नवरदेवासह त्याच्या कुटुंबाची सुद्धा जोरदार धुलाई करण्यात आली. या लग्नमंडपातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून हुंडा मागणाऱ्यांना चांगलाच धडा मिळेल असं म्हणत अनेकजण हे फोटो शेअर करत आहेत. नेमकं असं या नवऱ्याने काय मागितलं होतं हे पाहूया…

मंडवार पोलिस स्टेशनचे कैलाश चंद यांनी सांगितले की, १ मे रोजी नांगल गावातील लखन मीना यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह बेजूपाडा पोलिस स्टेशन हद्दीतील झुटाहेडा येथील कैलाश मीना यांचा मुलगा विजेंद्र (२८) याच्याशी होणार होता. विजेंद्रचे कुटुंबीय सोमवारी सायंकाळी सात वाजता मिरवणूक घेऊन नांगल गावात पोहोचले. गावात वरात काढण्यात आली. रात्री नऊ वाजता सप्तपदी होणार होती आणि त्यासाठी वधूपक्षाच्या लोकांनी पूर्ण तयारी केली होती.

Salman Khan struggles with sleepless nights after Baba Siddique’s murder
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर ‘अशी’ आहे सलमान खानची अवस्था; झिशान सिद्दिकी खुलासा करत म्हणाले, “भाई खूप…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
When Dharmendra answered if he converted to Islam to marry Hema Malini
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याबाबत दिलेलं उत्तर, म्हणालेले “मी असा माणूस…”
Jijau organization, Mahayuti, Thane district,
ठाणे जिल्ह्यात जिजाऊ संघटनेची साथ महायुतीला ?
prithvik pratap wedding
पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकल्यावर भेटीला पोहोचला प्रथमेश परब! नवीन जोडप्यासह शेअर केला फोटो; म्हणाला, “मेरे भाई…”
shiv sena eknath shinde marathwada candidate list For maharashtra assembly elections
मराठवाड्यातील उमेदवार वादाच्या रिंगणात
anupam kher kirron kher love story
घटस्फोटित अन् एका मुलाची आई असलेल्या किरण यांच्या प्रेमात पडले होते अनुपम खेर, ‘अशी’ झाली होती पहिली भेट
ulta chashma
उलटा चष्मा : ‘देवा’घरचा न्याय…

मुलीचे वडील लखन मीना यांनी सांगितले की, रात्री नऊ वाजता सप्तपदी होण्यापूर्वी वराने मंडपात पैशांसह बोलेरोची मागणी केली आणि या दोन्ही वस्तू मिळाल्या तरच सप्तपदीसाठी उभा राहीन, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद वाढत गेला. हे प्रकरण इतके वाढले की वधूच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी वर विजेंद्र आणि त्याचा मामा पप्पुलाल मीणा यांना बेदम मारहाण केली. या मारामारीत नवरदेवाचे पार कपडे फाटेपर्यंत धुलाई करण्यात आली होती.

हे ही वाचा<< UNO रिव्हर्स! चोराने हल्ला केला, तरुणीने अशी दाखवली जादू! Video पाहून म्हणाल, “यार काय कमाल डोकं.. “

पोलिसांच्या माहितीनुसार, नववधूच्या बाजूच्या लोकांनी काका-पुतण्या दोघांनाही ओलिस करून आपल्याजवळ ठेवले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी नंतर दोघांनाही सोडून दिले.दरम्यान नांगल गावातील मीना समाजाच्या पंचांनी निशाच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे. ५ मेपर्यंत या तरुणीचे लग्न करण्याचे वचनही दिले आहे.