Viral video: ‘हम आपके हैं कौन’ नावाचा सिनेमा आला आणि लग्नाची पद्धतच बदलून गेली. लग्न ‘इव्हेंट’ व्हायला लागलं. संगीत किंवा नवरदेवाचे बूट लपवण्यासारख्या गोष्टी आपल्याकडच्या लग्नात सुरू झाल्या. लग्नसोहळा ही गोष्ट गेल्या काही वर्षांत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाताना दिसते आहे. डान्स पासून वेगवेगळ्या कार्यक्रमांपर्यंत हल्ली लग्नामध्ये नियोजन केलं जातं. अशातच आता नवरा-नवरीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहेत.
लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यात सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. “खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली…” या मराठमोळ्या गाण्यावर नवरा नवरीनं स्वत:च्या हळदीला भन्नाट डान्स केला आहे. यावेळी नवरा नवरीचे एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ divya___3128 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत