लग्नसोहळ्यात बॅंड बाजाचा गजर वाजावा, शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वऱ्हाड्यांनी डीजेच्या तालावर नाचावं आणि सोहळा शुभ मंगल सावधानच्या मंगलाष्टकांनी दणाणून जावा, अशी प्रत्येक नवरा-नवरीची इच्छा असावी. पण, भर लग्नसोहळ्यात काही गालबोट लागलं, तर आनंदाच्या क्षणी डोळ्यांतून अश्रू तरळायला वेळ लागत नाही. असंच काहीसं एका लग्नसोहळ्यात घडलं आहे. स्टेजवर नवरीने नवऱ्याची ओवाळणी करायला सुरुवात केली. पण मंडपात असलेल्या वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहून नवरा नवरीसह त्यांच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

नवरा-नवरी स्टेजवर उभे असतात. त्यावेळी नवरी नवऱ्याची ओवाळणी करायला सुरुवात करते. पण स्टेजच्या खाली मंडपात असलेल्या वऱ्हाडी मंडळीमध्ये तुफान हाणामारी होते. हा सर्व धक्कादायक प्रकार पाहून नवरा स्टेजवरून बाजूला जातो. लग्नाला आलेल्या पाहुण्यांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे, हे नवऱ्याला समजताच त्याचा गोंधळ उडतो. वऱ्हांडी मंडळीत झालेलं कडाक्याचं भांडण पाहून नवऱ्याला काहीच सुचत नाही. या क्षणला काय करावं? याच गोंधळात पडलेला नवरदेव स्टेजवर उभा राहून हा धक्कादायक प्रकार पाहत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. वऱ्हाडी एकमेकांच्या अंगावर धावत येऊन ठोसे मारताना व्हिडीओत दिसत आहेत.

नक्की वाचा – Video: इंग्रजी शिकायला गेली अन् विद्यार्थीनीने ४२ वर्षीय शिक्षकासोबत प्रेमाचेच धडे गिरवले, थेट मंदिरातील व्हिडीओ झाला व्हायरल

मंडपात असलेल्या खुर्च्याही काही माणसं एकमेकांच्या डोक्यात टाकताना व्हिडीओत दिसत आहेत. काही माणसं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु, रागाने फणफणलेली माणसं शांत होत नाहीत, असं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आर के राज नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने याला १० लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom bride shocked after seeing guests fight in wedding ceremony marriage video goes viral on internet nss
Show comments