Viral Video : भारतीय लग्न सोहळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ कोणत्या ना कोणत्या कारणावरून व्हायरल होत असतात. लग्नात कधी कोणाचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी कोणाचा गाणी म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. कधी लग्नातील अनोख्या प्रथा व्हायरल होताना दिसतात तर कधी मजेशीर किस्से व्हायरल होतात. याशिवाय लग्नातील उखाण्याचे व्हिडीओसुद्धा तुफान चर्चेत येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरदेवाची गाडी दिसेल. ही नवरदेवाची गाडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव गाडीमध्ये बसून आला आहे पण ही गाडी फुलांनी नाही तर चिप्सच्या पुड्यांनी सजलेली दिसत आहे. तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

हेही वाचा : Viral News : स्टेडियममध्ये बसून आयपीएलची मॅच नव्हे तर ‘फ्रेंड्स’ सीरिज बघत होती तरुणी, व्हायरल होतोय फोटो

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कार दिसेल. ही कार चिप्सच्या पुड्यांनी सजलेली आहे. कार पुर्णपणे चिप्सच्या पुड्यांनी सजवलेली आहे. या कारवर वेगवेगळ्या चवींचे चिप्सच्या पुडे दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या कारमध्ये नवरदेव बसलेला आहे. नवरदेव येताच लोक या कारभोवती जमा होतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”

ysatpal569 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जेव्हा खाण्याची आवड असलेले जोडपे लग्न करतात…” तर एका युजरने लिहिलेय, “वरात दुकान घेऊन आली..” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्या भावाच्या लग्नात मी सुद्धा असंच डेकोरेशन करणार” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom car decorated with chips packets a groom making an extraordinary entry in wedding video goes viral on social media ndj