Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. नवरदेवाचा डान्स पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव आणि त्याच्या मागे तरुणी डान्स करताना दिसत आहे. नवरदेवाने काळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढरा शुभ्र शर्ट घातला आहे. तो खूप सुंदर दिसत आहे. लोकप्रिय साउथ इंडियन गाण्यावर हा नवरदेव डान्स करत आहे.
नवरदेवाच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्याच्या मागे डान्स करणाऱ्या तरुणी सुद्धा खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे पण नवरदेवाने सर्वांचे लक्ष त्याच्या:कडे वेधून घेतले आहे.

हेही वाचा : प्रेमसंबंधाचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

mahasphotographyofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, ” आमचं साउथ इंडियन गाणं खूप छान आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom dance at wedding on south indian famous song video goes viral on instagram reels social media ndj