Wedding groom Dance: लग्न म्हटलं की, दोन व्यक्ती, दोन कुटुंब एकत्र येतात. लग्न समारंभात अनेक मजा मस्तीही पहायला मिळते. मजा मस्तीशिवाय तर लग्न समारंभ फिकाच आहे. त्यामुळे लग्नामधील अनेक मजेशीर व्हिडीओ समोर येत असतात. खास करुन डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवरदेव नवरीही आपल्या लग्नात मनसोक्त नाचतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पहायला मिळतंय. समोर आलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही. अशाच एका नवरा नवरीने त्यांच्या हळदी समारंभात भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहून तुम्हीही कौतुक कराल. दोघेही एकदम खास अंदाजात एकमेकांसोबत नाचताना पाहून आजपासचे लोकही टाळ्या वाजवत त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत.

“काळजाचं पाणी पाणी करतीया पोर गं होशील का या पठ्ठ्याची सोबर घरवाली” या मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवानं नवरीसोबत डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे..डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा-नवरी एकत्रिक धमाकेदार डान्स करत आहे. यावेळी नवरा नवरीचा उत्साह पाहण्यासारखा आहे. नवरा नवरी रोमँटिक मूडमध्ये डान्स करत असताना आजुबाजूला असणाऱ्या साऱ्यांच्याच नजरा या जोडप्यांवर होत्या. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shraddhaaa नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत म्हंटंलय, “एक नंबर जोडी”