Groom dance viral video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही. अशाच एका मारवाडी नवऱ्यानं त्याच्या महाराष्ट्रीयन बायकोसाठी भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहून तुम्हीही कौतुक कराल.

पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरूवात करतात. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांच्या सुख दु:खात कायम बरोबर राहतात. या नात्यात एक वेगळे प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे.

Terrifying video of a Woman fell into open manhole with 9 months old baby viral video on social media
पोटच्या मुलापेक्षा फोन महत्त्वाचा! मोबाइलवर बोलता बोलता ९ महिन्याच्या बाळासह भल्योमोठ्या खड्ड्यात पडली, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Viral Photo
Viral Photo : वॉचमन म्हणून दरवाजाबाहेर उभे राहिले, लेकाने २५ वर्षांनंतर त्याच फाइव्ह स्टार हॉटेलात बापाला घातले जेवू ; Photo चर्चेत
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
aap mla amanatullah khan son
“मला लायसन्सची गरज नाही, माझा बाप…”, आप आमदाराच्या मुलाची वाहतूक पोलिसांवर अरेरावी, वाहतुकीचे नियम मोडून म्हणाला…
Transport Minister Pratap Sarnaik urged creating role model for sustainable environment friendly development taking place at open space of ST
ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ, रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार
Waqf Board Bill JPC meeting
Waqf Board Bill: संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा; अरविंद सावंत, असदुद्दीन ओवेसींसह १० खासदार निलंबित

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मारवाडी नवरदेव आणि महाराष्ट्रीयन नवरीचं लग्न आहे. यावेळी नवरदेवानं आपल्या होणऱ्या बायकोसाठी खास मराठी गाण्यावर तुफान डान्स केला आहे. हे पाहून नवरीही अवाक् झाली असून नवरीचीही रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे. “अगं मनात माझ्या आली साधी नितळ भावना, किती Alone राहू आता चल Couple होउना, बघ तरी गोडीत..लक्झरी गाडीत..आलोया मै हूँ DON बेबी ब्रिंग इट ऑन” या मराठी गाण्यावर आपल्या मित्रांसोबत नवरदेवानं भन्नाट असा डान्स केला आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरू असतात. आपलं लग्न झालं याचा आनंद प्रत्येकाला असतो, जो नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरील हास्यातून झळकतो. पण काही नवरा-नवरी असे असतात जे हा आनंद फक्त हास्यातून दाखवत नाही. तर त्यांना खुलेपणाने व्यक्त करायला आवडतं. अशाच एका नवरदेवाचा डान्स सध्या व्हायरल होतोय.

Story img Loader