Groom dance songs for bride video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरू असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो. काहीतरी हटके करण्याच्या नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यामध्ये पुण्यातल्या एका नवरदेवानं अशा ठिकाणी जाऊन डान्स केलाय की पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
सोशल मीडियावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. यामधील काही व्हिडीओंमध्ये लग्नातील धम्माल, मस्ती, गाणी, डान्स वगैरे पाहायला मिळतात; तर काहीवेळा नवरा नवरी असं काही करतात की ते व्हायरल होतात. असाच एक नवरदेव सध्या त्याच्या डान्समुळे व्हायरल होतोय. सध्या सोशल मीडियावर लग्नाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात, “जेव्हा नवरदेवाला मनासारखी बायको भेटते.” हा नवरदेव स्वत:च्याच लग्नात भान हरपून नाचत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा नवरदेव नाचता नाचता चक्क साऊंड सिस्टीमवर चढून डान्स करू लागला आहे. यावेळी नवरदेवाचे मित्र खाली उभं राहून नाचत असून त्यांची जुगलबंदी सुरू आहे.
“मी भेटल जवा गुन्ह्यात मला अटक करा पुण्यात” या व्हायरल गाण्यावर नवरदेव डान्स करताना दिसत आहे. नवरदेवाचा उत्साह पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. नवरदेवाने इतर सर्वांना डान्समध्ये अक्षरश: फेल केले आहे. या व्हिडीओला खूपच पाहिले जात असून तो जास्त पसंत केला जात आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/C-OySu9qNPW/?utm_source=ig_web_copy_link
हेही वाचा >> VIDEO: नगरकरांचा नादच खुळा! आप्पांनी दुधाच्या गाड्यावर लावला असा बॅनर की लोकांची होऊ लागली तुफान गर्दी
सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_royal_karbhar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहिलं आहे की, “नवरदेवाचा आनंद गगनात मावत नाहीये”, तर आणखी एकानं “थांब भावा, लग्न मोडेल” अशी प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एका युजरने लिहिले… “एक पुरुष आपल्या आवडत्या स्त्रीसाठी काहीही करू शकतो.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… “आपल्याला आयुष्यात इतकाच आत्मविश्वास हवा आहे.”