Viral video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरु असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो. काहीतरी वेगळं हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये नवरदेवानं आपल्या मित्रांसोबत बायकोसाठी खास डान्स केला आहे.

आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील नवरदेवाच्या मित्राचा डान्स सध्या तुफान व्हायरल होतोय.

सोशल मिडीयावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मिडीयावर लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता, नवरदेवानं आपल्या मित्रांसोबत  “दिलात झापुक झूपूक वाजत राहतय गं” या गाण्यावर डान्स करत आहे. त्याच्या डान्स स्टेप अशा आहेत की सगळेच पाहात राहिले आहेत. नवऱ्याने इतर सर्वांना डान्स मध्ये अक्षरश: फेल केले आहे. नवरीचीही रिअॅक्शन यावेळी पाहण्यासारखी आहे. या व्हिडीओला खूपच पाहिले जात असून पसंद केले जास्त आहे. सगळ्या मित्रांनी अक्षरश: स्टेज हलवून टाकला आहे मात्र तरीही नवरदेवाने सर्वांचे लक्ष त्याच्या:कडे वेधून घेतले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ marathi_royal_karbhar या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “भावांनो असं नाचणार असाल तरच लग्नाला या” असं लिहलं आहे. यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, नवरदेवानेही याच्या लग्नात अशीच मस्करी केली असेल म्हणूनच मित्र बदला घेत आहे. आणखी एकाने लिहिलं, “मित्रांशिवाय आयुष्य नाही.” यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Story img Loader