Viral video: सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. खास करुन नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते. कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात. असाच एक लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल अशी मेहुणी असावी तर अशी.

भर लग्नात मेहुणीनं दाजींना डान्स करण्याचं चॅलेंज दिलं. मग काय दाजी थोडीच ऐकणार त्यानं देखील मेहुणीचं आव्हान स्विकारत तिच्यासोबत चांगलीच जुगलबंदी केली. पण या डान्स स्पर्धेत जिंकलं तरी कोण? हा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा जास्त भारी कोण नाचलंय? दाजी की मेहुणी

Groom bride dance video in there haldi on Khandeshi song video goes viral on social media
VIDEO: “करमन लगन” खानदेशी गाण्यावर नवरा-नवरीनं हळदीला केला भन्नाट डान्स; नातेवाईकही पाहतच राहिले
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
School teacher dance on marathi song pavan jevala kay song with student school video goes viral
पाव्हणं जेवला काय? जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO पाहून म्हणाल शिक्षक असावा तर असा!
Girls perform lavani
VIDEO: आरारारा लैच खतरनाक! काय ती ‘कातील अदा’ “अशी मी मदन मंजिरी…” गाण्यावर तरुणींची जबरदस्त लावणी एकदा पाहाच
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Dance video of a woman dancing in Mumbai local on aagri koli song video viral on social media
आगरी-कोळी गाण्याचा नादच भारी! मुंबई लोकलमध्ये महिलेचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक
In pune boy drive scooty with holding silencer in hand indian jugaad
VIDEO: हे फक्त पुण्यातच होऊ शकतं! सायलेन्सर हातात पकडून चालवतायत स्कूटी; पुणेरी जुगाड पाहून डोक्याला हात लावाल
splash cold water
क्रूरतेचा कळस! रेल्वे फलाटावर झोपलेल्या बेघरांवर ओतलं थंड पाणी; चिमुकली मुलं ओल्या कपड्यांत थंडीत कुडकुडली!

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मांडवात दाजी त्यांच्या मित्रासोबत डन्स करत आहेत तेवढ्यात नवरीची बहिण येते आणि दाजींना डान्ससाठी आव्हान देते. अर्थात सगळ्यांसमोर मिळालेलं आव्हान दाजी देखील स्विकारतात. आणि मग दोघंही प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणिबाणी ग ये ना प्रिये ! तु ये ना प्रिये. मी तर प्रेम दिवाणा रसिला, दे प्यार जरासा नशिला मी तर प्रेम दिवाणा रसिला दे प्यार जरासा नशिला गाण्यावर नाचू लागतात. दोघंही जबरदस्त डान्स करतात. वेगवेगळ्या स्टेप्स मारू दाखवतात. पाहुणे मंडळी देखील टाळ्या शिट्ट्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देतात. दाजी आणि मेहुणीची ही जबरदस्त जुगलबंदी पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल. हा व्हिडीओ १ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या दोघांच्या डान्सचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “करवल्या गो करवल्या नाजुक-साजुक”; आजीनं नातवाच्या लग्नात केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, हौसेला वय नसतं!

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर dhanashreegite2_official नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला भरपूर लाईक्स मिळत आहेत. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader