Groom Makes LED Light Clothes For Bride Video Viral : एकमेकांवर जीवापाड प्रेम असणारे जोडपे आपल्या जोडीदारासाठी काय करतील, याचा अंदाच बांधणे कठीण आहे. लग्न समारंभात पाहुण्यांच्या समोर आकर्षित दिसण्यासाठी नवरा-नवरी भन्नाट मेकअप करत असतात. अशाच प्रकारचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नवरी लग्नमंडपात चमकत राहण्यासाठी नवऱ्याने चक्क एलईडी लाईटचा लेहेंगा डिजाईन केला. नवरा-नवरीचा हा भन्नाट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. नवऱ्याने बायकोसाठी चमकणारा एलईडी लेहेंगा कशाप्रकारे बनवला, हे या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरी रिहॅब डॅनियलने लग्नाचा पोशाख परिधान करून इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, माझ्या मेहंदीच्या २०२३ मधील आठवणी. माझं पोशाख माझ्या सुपर डुपर नवऱ्याने डिझाईन केलं आहे. माझ्या नवऱ्याला नेहमी वाटायचं की, मी त्यांच्या खास दिवसानिमित्त चमकत राहावी. कोणत्याही नवऱ्याने त्याच्या बायकोसाठी असा प्रयत्न केला नसेल, हे मला माहित आहे.

नक्की वाचा – शुबमन गिलच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने दिल्या जबरदस्त शुभेच्छा, नेटकरी म्हणाले, “साराच्या खऱ्या अकाऊंटवरून…”

इथे पाहा नवरीचा जबरदस्त व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, डॅनियल खास पोशाख परिधान करून नवऱ्याच्या हात पकडून लग्नमंडपात जाते. लईडी लाईटचा लेहेंगा घातल्यावर लग्नमंडपात लाईटचा झगमगाट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २.५ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर ३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओला लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलंय, खूप सुंदर, हे खूप जबदरस्त आहे. तर अन्य एक यूजर म्हणाला, खूप छान…पण पुन्हा अशी मेहनत घेऊ नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom designed led light lehenga for bride to shine in the marriage ceremony couple beautiful video viral on instagram nss