लग्न दोन व्यक्तींना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा प्रत्येकासाठीच खूप खास असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि तो पाहून आपसूकच आपल्या ओठांवर हसू येतं. पण सगळ्याच लग्नात असं होत नाही. सध्या अशीच घटना मध्य प्रदेशातील एका ठिकाणी घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात, नवरदेव लग्नाच्याच दिवशी आपले प्राण सोडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृत्यू कधी सांगून येत नाही, असं म्हतात. अगदी ठणठणीत असलेल्या माणूसदेखील अचानक आपला जीवही गमावतो. कधी कुठे आपल्या नशीबी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. त्यात नशीबाने साथ दिली नाही तर अगदी आनंदाच्या दिवशीदेखील वाईट घडू शकतं. असाच प्रकार त्या नवरदेवाबरोबर घडला आणि तो मृत्यूच्या सापळ्यात अडकला. नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊ या…

स्वत:च्याच लग्नात सोडले प्राण

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून कोणाची वेळ कधी येईल हे सांगता येत नाही असं तुम्हालाही वाटेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की भर लग्न समारंभात काळाने नवरदेवाचा घात केला. या लग्नसमारंभात नवरदेव घोड्यावर बसून आपला खास दिवस एन्जॉय करताना दिसतोय. पण तो घोड्यावर बसला असतानाच अचानक कोसळतो आणि जागच्या जागी आपले प्राण सोडतो. ही घटना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील आहे असं या व्हिडीओच्या कॅप्शनमधून दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @sachinguptaindia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात, लग्न समारंभात घोड्यावर बसलेल्या वराचा अचानक मृत्यू झाला.” अशी कॅप्शन याला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

नवरदेवाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असा मृत्यू कोणाच्याच नशीबी नको येवो.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हे बघून खूप वाईट वाटलं” तर तिसऱ्याने “आजकाल मृत्यू कधी येईल याची खात्री नाही.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हे कदाचित डीजेच्या आवाजानेदेखील झालं असेल”