Viral video: लग्न समारंभात याआधी बरेचदा वाद किंवा राडे होण्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. लग्न म्हटले की छोटो-मोठे वाद आणि नाराजी ही होतेच. मात्र असे वाद किंवा नाराजी ही बोलून लगेच सोडवली देखील जाते. पण अनेक वेळा अशा काही घटना घडतात ज्यामुळे सर्वच गोष्टी बिघडतात. भारतात लग्न समारंभात मुलगी किंवा मुलगा पळून गेल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र सध्या जी घटना समोर आली आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.. चीनमधील एका लग्नातील अशी एक घटना समोर आली आहे ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहे.
भर लग्नात भावी पत्नीच्या अफेअरचा खुलासा –
ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं, त्या व्यक्तीसोबत नव्या आयुष्याची स्वप्न बघीतली त्याच व्यक्तीनं जर आपल्यासोबत विश्वासघात केला तर? कल्पनाही करवत नाही ना, अशीच घटना चीनमध्ये घडली. तिचा हा विश्वासघात पाहून नवरदेवाला धक्का बसला आहे. यानंतर सर्व पाहूण्यांसमोर भर कार्यक्रमात नवरदेवानं होणाऱ्या पत्नीचा दुसऱ्या एका व्यक्तीसोबतच्या अफेअरचा खुलासा केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या रिसेप्शन पार्टीसाठी सगळे पाहुणे एकत्र आले होते. नवरदेव आणि नवरी छान तयार होऊन स्टेजवर एन्ट्री घेतात. वऱ्हाडी आनंदाने वधूवरांचं स्वागतही करतात. मात्र पुढच्याच क्षणी स्टेजवरील प्रोजेक्टरवर वधुच्या आणि तिच्या प्रियकराचे प्रायव्हेट व्हिडीओ प्ले होतो. या धक्कादायक खुलाशानंतर सर्व पाहुणे हैराण झाले.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral video: अजून माणुसकी जिवंत! जीवाची पर्वा न करता तरुणाने वाचवला जखमी पक्षाचा जीव
या धक्कादायक खुलाशानंतर सर्वच शॉक होतात, आणि एकच गोंधळ होतो. वधुच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नवरी त्या नवऱ्याला हातातील बुके फेकून मारते. सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरु असून आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.