लग्नाच्या सिजनमध्ये डान्सचे व्हिडीओ आणि मजेदार क्षणाचे व्हिडीओ व्हायरल होतात. लग्न असेल आणि धमाकेदार डान्स नसेल तर ते होऊ शकत नाही. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नात काही विदेशी अक्षय कुमारच्या गाण्यावर नाचताना दिसत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. प्रत्येकजण अशी कंबर कसून नाचतो, जे पाहून युजर्स आश्चर्यचकित होतात. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड शेअर केला जात आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही विदेशी बाराती ‘चुरा के दिल मेरा गोरिया चली’ या बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. प्रत्येकाची नृत्यशैली आणि एक्सप्रेशन लोकांची मनं जिंकत आहे. प्रत्येकाच्या अप्रतिम डान्स स्टेप्स पाहून लोकही कौतुक करताना थकत नाहीत.
(हे ही वाचा: Video: प्रियकरासह पोलीस स्टेशनला पोहोचली राखी सावंत, रडत पूर्वाश्रमीच्या नवऱ्यावर केले ‘हे’ आरोप)
(हे ही वाचा: पाणी पिणाऱ्या सिंहाला ‘या’ व्यक्तीने मागून ढकलायचा केला प्रयत्न अन्; Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले – अक्षय कुमारही तुमच्यासमोर फेल झाला. तर दुसर्या वापरकर्त्याने कमेंट करून लिहिले, काय अप्रतिम डान्स आहे, तर एका युजरने म्हटले की, सुपर कूल डान्स. १ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आणि पसंत केला आहे.