Groom And Bride Viral Video : लग्नसराईचा सीजन सुरु झाल्यापासून नवरा-नवरीचे भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नसोहळ्या वधू-वराकडून मित्रमंडळी, नातेवाईकांना आग्रहाचे आमंत्रण केले जाते. वऱ्हाड्यांशिवाय लग्नसोहळ्याची रंगतही वाढत नाही. पण नवऱ्याचा एखादा मित्र भर लग्नमंडपात वरमाला घालण्याचे विधी सुरु असतानाच प्रवेश करतो आणि जोरजोरात ओरडू लागतो. त्यावेळी स्टेजवरील नवरा-नवरी थक्का झाल्याशिवाय राहणार नाही. असाच एक प्रकार व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. मित्रांकडून केले जाणारे विनोद माणसं विसरु शकतात. पण एका तरुणाने लग्नसोहळ्यात जे केलं, ते कुणीच विसरणार नाही. कारण मित्राने केलेली मस्ती मनोरंजन करणारी नव्हती. त्या तरुणाने असं काही केलं की, लग्नात उपस्थित असलेल्या सर्वा पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवऱ्याच्या मित्राला पाहून लग्नमंडपात नवरीला आश्चर्य वाटलं, कारण…

लग्नात फक्त नातेवाईकच येत नाहीत, तर मित्रमंडळीही कुटुंबियांसोबत मस्ती मजाक करताना दिसतात. वरमालाचे विधी सुरु असताना नवरा-नवरी स्टेजवर उभे असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. नवरा-नवरीने वरमाला घालायला सुरुवात करताचा त्यांच्या एका मित्राने घोषणाबाजी करुन सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. नवरऱ्याच्या मित्राचं कृत्य पाहून नवरीही थक्क झाली. कारण नवऱ्याच्या मित्राने लग्नसोहळा सुरु असताना भारत माता की जय, जवाहरलाल नेहरु की जय, महात्मा गांधी की जय, सुभाषचंद्र बोस की जय, अशी घोषणाबाजी सुरु केली. त्या तरुणाने घोषणा सुरु केल्यानंतर लग्नमंडपात असलेले वऱ्हाडीही काही वेळ स्तब्ध झाल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Video : कारच्या रुफवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स, हायवेवरील तो व्हिडीओ झाला व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

लग्नसोहळ्यातील हा व्हिडीओ maurya_sumanth_mani नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर लाखोंच्या संख्येत या व्हिडीओला व्यूजही मिळाले आहेत. हा मजशीर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका महिलेनं प्रतिक्रिया देत म्हटलं, “मी असते तर खूप हसू आलं असतं पण नवरीने कोणतंही रिअॅक्शन दिलं नाही.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तु्म्हालाही देशाचा सार्थ अभिमान वाटेल. तसंच या तरुणाने केलेली घोषणाबाजी पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom friend enters in wedding ceremony bride shocking reaction after seeing comedy scene funny video clip viral on instagram nss