Groom Injured Sparkler Gun Video : आजकाल लग्नाच्या वरातीत डीजे, ढोल-ताशांबरोबर फटाके फोडण्याचा ट्रेंड वाढत आहे. हल्ली या गोष्टींशिवाय जोडप्यांना लग्नसोहळा आणि एकंदरीतच लग्न अपूर्ण वाटते. विशेषत: जितकं लग्न समारंभाचे स्वरूप भव्य तितकी फटाक्यांची आतषबाजीही मोठ्या प्रमाणात व्हायला हवी, असा एक ट्रेंड दिसतो. फार पूर्वीपासूनच लग्नाच्या वरातीत फटाक्यांचा वापर केला जातोय; पण हल्ली लोक वरातीत अतिशय धोकादायक पद्धतीने फटाके फोडताना दिसतात. त्यामुळे अशा काही मोठ्या दुर्घटना घडतात; ज्याचा आपण कधीही विचारही केलेला नसतो. सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या वरातीतील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

त्या व्हिडीओमधील वरातीत नवरदेव रथावर उभा राहून नाचत होता, त्यावेळी त्याच्या हातातील स्पार्कल गनने अचानक पेट घेतला अन् पुढे जे घडायला नको होतं तेच घडलं. स्पार्कल गनमधून उडणारे आगीचे छोटे गोळे नवरदेवाच्या रथावर पडत होते. या छोट्या गोळ्यांमुळे रथाने अचानक पेट घेतला. त्यानंतर एक मोठा स्फोटदेखील झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, रथाच्या आजूबाजूला फक्त आगीचा भडका उडाल्याचे दिसून येत होते. या दुर्घटनेमुळे नवरदेवाला लग्नमंडपात नेण्याआधी थेट रुग्णालयात न्यावे लागले. हा व्हिडीओ पाहून जो तो अवाक झाला आहे. त्याशिवाय नेटकरीही विविध कमेंट्स करीत आहेत.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

नवरदेवाला स्पार्कल गन घेऊन स्टंटबाजी करणं आलं अंगलट

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, अगदी आनंदात नवरदेवाला रथात बसवून लग्नाची वरात निघाली आहे. यावेळी रथाच्या पुढे बॅण्डबाजा वाजतोय, पाहुणे मंडळी नाचतायत. सर्व काही उत्साहात सुरू होते. दरम्यान, रथावर नवरदेव हातात स्पार्कल गन पेटवून उभा राहिला. आजूबाजूचे लोकही नवरदेवाची ही स्टंटबाजी पाहत होते. त्यावेळी स्पार्कल गनमधून उडणारे आगीचे छोटे छोटे गोळे रथावर पडत होते. याच आगीच्या छोट्या छोट्या गोळ्यांमुळे रथाने पेट घेतला आणि रथात मोठा स्फोट झाला. क्षणार्धात सर्व रथभर आग पसरली. त्या आगीत नवरदेव आणि त्याचे काही मित्रदेखील अडकले.

groom friends lighting sparkle guns on horse carriage in baraat video viral

आग हळूहळू सर्वत्र पसरू लागली आणि त्यामुळे लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. हा स्फोट इतका मोठा होता की, रथाला बांधलेले घोडेदेखील घाबरले. मग घोड्यांनीही जीव वाचवण्यासाठी धाव घेतली आणि संपूर्ण रथ आगीचे भक्ष्य झाला. या आगीची व्याप्ती वाढली आणि त्यात नवरदेवासह रथावर उभ्या असलेल्या लोकांनाही गंभीर दुखापती झाल्या असण्याची शक्यता आहे. ही सर्व दुर्घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली; ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नाच्या वरातीतील हा व्हिडीओ @varun_tomar315 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये, ‘वराच्या रथाला लागली आग’, असे लिहिलेय. लोक व्हिडीओवर भरपूर कमेंट्स करीत आहेत. अनेकांनी लग्नाच्या वरातीत आणि लग्न समारंभात अशा धोकादायक पद्धतीने फटाके फोडू नका, असा सल्ला दिला आहे.

Story img Loader