Groom Funny Dance Video: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे.

सोशल मीडियावर अनेकदा लग्नसोहळ्यातील असे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक वरातीतला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक नवरदेव वरातीत अगदी आनंदात जबरदस्त डान्स करताना दिसतोय.

Viral Video Of Husband and wife
‘कोणाचीही पर्वा न करता…’ बायकोला नाचताना पाहून ‘त्याने’ही धरला ठेका; व्हायरल VIDEO नक्की बघा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Man dance for wife on 25th anniversary
“जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात…” २५ व्या वाढदिवसानिमित्त ‘त्यांनी’ केला बायकोसाठी जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी फिदा
school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
husband dance with disabled wife
‘असे टिकते नाते!’ दिव्यांग पत्नीसाठी नवऱ्याने केला जबरदस्त डान्स! VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावरील येईल हसू
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
son-in-law dance with father-in-law
‘बाबा, असा जावई शोधून सापडणार नाही…’ भरमंडपात जावयानं भावी सासऱ्यांबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक

हेही वाचा… शेवटी आईचे संस्कार! चिमुकल्याने लहान वयातच असं करून दाखवलं जे आज मोठ्यांनाही जमत नाही, प्रत्येक मुलाने बघावा असा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला नवरदेवाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. यात एक नवरदेव आपल्या वरातीत जबरदस्त डान्स करताना दिसतोय. डोक्यावर फेटा, बाशिंग आणि सूट-बूट घालून हा वर वरातीत अगदी वेगवेगळ्या स्टेप्स करत डान्स करतोय. अशा स्टेप्स तुम्ही कधीच पाहिल्या नसतील एवढं नक्की. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

नवरदेवाचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @knowledge_wid_adi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “असा डान्स येत असेल तरच लग्न कर मित्रा, नाहीतर तू सिंगलच ठीक आहेस” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… वरातीत प्रियकराची दादागिरी! नवरदेवाच्या गाडीवर केली दगडफेक, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…

युजर्सच्या प्रतिक्रिया

वराच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मग तरीही हे लग्न झाल का..?”. तर दुसऱ्याने “तुला मुलगी कोणी दिली, हा प्रश्न मला पडलाय ” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “डान्स करतोय तो पण लाज मला वाटतेय.” एकाने “आज नाचून घे मित्रा नंतर वर्षभर नाचायची इच्छा होणार नाही” अशीदेखील कमेंट केली.

Story img Loader