Marriage Ceremony Viral Story : धावपळीच्या जीवनात कधी काय होईल, याचा नेम राहिला नाही. आयुष्य वाऱ्याच्या वेगासारखं पुढं जात असतानाच कोणत्या वळणावर जीवाला मुकावं लागेल, हे सांगता येत नाही. कारण एका लग्नसोहळ्यात नवरीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुजरातच्या भावनगर येथील भगवानेश्वर महादेव मंदिरात ही घटना घडली. भर लग्नसोहळ्यात नवरीचा मृत्यू झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. नवरीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न नवऱ्यासोबत लावण्याचा निर्णय मृत नवरीच्या कुटुंबियांनी घेतला. हेतल असं मृत पावलेल्या नवरीचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत सविस्तर वृत्त असं की, हेतलची प्रकृती ठिक नव्हती. अशातच ज्या दिवशी तिचं लग्न होतं, त्यावेळी ती अचानक स्टेजवर कोसळली. त्यानंतर तिला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, हेतलचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषीत केलं अन् कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला. विशाल नावाच्या तरुणासोबत हेतलचं लग्न ठरलं होतं. परंतु, हेतलचा मृत्यू झाल्याने विशालसोबत हेतलच्या बहिणीचं लग्न जुळवण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला.

नक्की वाचा – टीव्हीचा रिमोट नाही, चांगझोऊ विद्यापीठाने बनवलाय किसिंगचा रिमोट, व्हायरल Video पाहून थक्क व्हाल

हेतलच्या मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली होती. मात्र, भावनानगर शहरातील नगरसेवक आणि मालधारी समाजाचे नेते लक्ष्मणभाई राठोड यांनी सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना सामाजिक सलोखा जपण्याची विनंती केली. नवरीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुख:चं सावट पसरलेलं असतानाच लग्नमंडपात असलेल्या नवऱ्यासोबत हेतलच्या बहिणीचं लग्न जुळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom gets married with brides younger sister because of bride dies of heart attack in wedding rituals nss