Bride Groom Video: लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. यात नवरा नवरीचा डान्स, पाहुण्यांच्या करामती हे प्रमुख आकर्षण असतं. मात्र असे देखील व्हिडिओ असतात जे आपल्याला प्रचंड हसवतात. यामध्ये नवरीचे होणारे भांडणाचे व्हिडीओ जास्त व्हायरल होतात. तर काही व्हिडिओ असेही असतात जे पाहून असे वाटते की ते व्हायरल व्हावेत अशा पद्धतीने मुद्दाम बनवले आहेत. आता या यादीत एका नवीन व्हिडिओने एंट्री घेतली आहे. ज्यामध्ये नवरा नवरीला उचलत घेत स्टेजवरून उतरताना पायऱ्यावरून घसरल्याचं दिसत आहे. पण त्यानंतर नवऱ्याने केलेली कृती चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा नवरीला उचलून घेत स्टेजवरून खाली घेऊन जाताना दिसत आहे. पण तितक्यात नवऱ्याचा पाय घसरतो आणि तो नवरीला घेऊन खाली पडतो. मात्र नवरीला तो पडू देत नाही. दरम्यान, तो खाली पडून पायऱ्यांवर बसताच अचानक नवरीच्या गालाचे चुंबन घेतो आणि हे बघून नवरी त्याच्याकडे हसत बघत राहते. नवऱ्याची ही स्टाईल लोकांना खूप आवडली आहे, त्यामुळे या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत.

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: भर लग्नमंडपात कुटुंबीयांनी उडवले लाखो रुपये; पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा)

हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर joyajaan816 नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे आणि ते नवऱ्याचे कौतुकही करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले ‘तो पडला पण त्याने स्वतःचा आणि पत्नीचा अपमान होऊ दिला नाही’ तर दुसर्‍याने लिहिले ‘पडल्यानंतरही वराचा आत्मविश्वास कमी झाला नाही.’

Story img Loader