Viral Video: लग्नसमारंभ असला की, घरात प्रत्येक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू असते. साखरपुडा, प्री वेडिंग, मेहेंदी, संगीत, हळद आणि मग लग्न असे अनेक कार्यक्रम लग्नघरात होतात. तर लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा दिवस कसा खास करता येईल याकडे नवरा-नवरीचं लक्ष असते. मग यासाठी वरात घेऊन येण्यापासून ते मंडपात प्रवेश (एंट्री) करताना डान्स करणे आदी अनेक गोष्टी करताना दिसतात. आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत घोड्यावरून वरात घेऊन येण्यापेक्षा एथरच्या रिझता इलेक्ट्रिक स्कूटरवरून वरात घेऊन जाण्यास प्राधान्य दिलं आहे.
पीक बंगळुरूच्या एक्स (ट्विटर) व्हिडीओत वरातीसाठी घोड्याच्या जागी एथर इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर केल्यामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवऱ्या मुलाचे नाव दर्शन पटेल असे आहे. त्याने स्वतःच्या वरातीसाठी एथर रिझता इलेक्ट्रिक स्कूटरला हार, फुलं, तोरणं लावून खूप छान सजवण्यात आले आहे ; जसं अगदी घोड्याला किंवा लग्नाच्या गाडीला सजवले जाते. तसेच कुटुंबातील मंडळी देखील फेटा घालून एथर इलेक्ट्रिक स्कूटर भोवती वर्तुळाकार नाचत आहेत. तसेच काही फोटोग्राफर हे खास क्षण नमूद करताना दिसून आले आहेत. एकदा पाहाच ही अनोखी वरात.
हेही वाचा…‘काहीचं बदललं नाही…’ मुंबई लोकलचा ‘तो’ जुना फोटो पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, नवऱ्याकडून नवरीच्या घरी वरात जाते. साधारणपणे लग्नाची वरात एका कारमधून, तर सहसा घोड्यावरून येते. पण, आज एथर इलेक्ट्रिक स्कूटरवरून एक अनोखी वरात रस्त्यावरून जाताना दिसत आहे. एथर एनर्जीचे सीईओ आणि सह-संस्थापक तरुण मेहता यांनीया वरतीचा व्हिडीओ शेअर करीत लिहिले की, “हे गेल्या वीकेंडला घडलं! दर्शनला त्याची वरात एथर इलेक्ट्रिक स्कूटरवरून घेऊन जायची होती आणि आम्ही त्याची वरात आणखीन खास केली”; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @peakbengaluru या एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओतील केंद्रबिंदू ‘रिझता’ ही एथर कंपनीची नवीन लाँच केली इलेक्ट्रिक स्कूटर आहे ; ज्याचा दर्शन पटेल यांनी वारातीसाठी अगदीच खास उपयोग केलेला दिसून येत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा या अनोख्या कल्पनेचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. प्राण्यांवरून बसून अनेकदा या वराती मंडपापर्यंत नेल्या जातात. पण, हा उपाय अगदीच पर्यावरणपूरक आहे ; अशी एका युजरने कमेंट केली आहे.