Bride and Groom Viral Video: सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाला सुरुवात तर झालीय. पण लग्नसराईचा सीजनही सुरु असल्याने एकापेक्षा एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हळदीच्या लग्नमंडपात बेभान होऊन नाचणाऱ्यांचे व्हिडीओत तर व्हायरल होताना दिसतच आहेत. पण आता नवरा-नवरीच्या एका व्हिडीओनंही इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. लग्नमंडपात नवरा नवरीला थिरकताना अनेकवेळा व्हिडीओंच्या माध्यमातून पाहिलं असेल. पण एका नवरीने भर लग्नमंडपात पुल-अप्स मारून चक्क व्यायामशाळाच भरल्याचा कारनामा केला आहे. डीजेच्या तालावर नवरी थिरकताना या व्हिडीओत दिसत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे लग्नाच्या पहिल्याच दिवशी या नवरीने लग्नमंडपात पुल-अप्स मारून सर्वांच्या भुवया उंचावल्या. नवरीचा भन्नाट डान्स आणि पुल-अप्स पाहून वऱ्हाडीही चक्रावले.
नवरीने सर्वांसमोर पुशअप्स मारल्यावर नवऱ्याने काय केलं?
लग्न सोहळ्यात डान्स करणारी नवरी आता एक नवीन ट्रेंड घेऊन आली आहे. कुणी बाईकने एन्ट्री मारतो तर कुणी भन्नाट स्वॅगमध्ये लग्नमंडपात येतो. पण या नवरीचाही स्वॅग पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या नवीन व्हिडीओनं लोकांना चक्रावून टाकलं आहे. नवरी आधी लग्न मंडपात भन्नाट डान्स करताना या व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर नवरीला व्यायाम करण्याचा मोह आवरला नाही. नवरी थेट मांडवात असलेल्या पोलला लटकून पुल-अप्स मारायाल सुरुवात करते. नवरीचा व्यायाम पाहून नवराही पुल-अप्स मारायला जातो. भर लग्नमंडपात नवरा-नवरीने भरलेली व्यायामशाळा पाहून वऱ्हाडी पुरते चक्रावून जातात.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ झाला तुफान व्हायरल, इथे पाहा व्हिडीओ
लग्न सोहळ्यात अशाप्रकारचे भन्नाट डान्स आणि व्यायाम पाहून कुणाच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी फिटनेसबाबत प्रेरणा मिळाली. weddingsutra नावाच्या युजरने हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तसेच या व्हिडीओला लाखो व्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “एक महिला जी व्यायाम करते, ती नक्कीच प्रेरणादायी असू शकते. सर्वच महिलांनी फिटनेसचं महत्व माहित नाहीय. याच गोष्टीचं दु:ख आहे.”