Groom Ran Away With Sister In law : लग्नसोहळ्यातील अनेक धक्कादायक गोष्टी व्हायरल बातम्यांच्या माध्यमातून समोर येतात. नवरा-नवरी नटून थटून आल्यानंतर लग्नमंडपात एखादी विचित्र घटना घडते आणि पाहूण्यांनाही धक्का बसतो. असाच एक भयंकर प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेली येथे घडला आहे. लग्नाची सर्व तयारी झाली असताना नवरी लग्नमंडपात आली आणि नवऱ्याची वाट बघतच राहिली. कारण नवऱ्याने चक्क त्याच्या मेहुणीला पळवून नेलं आणि नवरीला याचा पत्ताही लागला नाही. नवरा स्टेजवर आला नाही, त्यामुळे उपस्थित सर्व पाहूण्यांना धक्काच बसला. नवऱ्याचं प्रेम नवरी आणि तिच्या बहिणीशी जडलं होतं, अशी धक्कादायक माहिती घडलेल्या प्रकारानंतर समोर आली.

ही भयानक घटना बरेलीच्या नवाबगंज येथे घडली. नवऱ्या नवरीच्या बहिणीला पळवून नेल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. नवरा-नवरीचं लग्न दोघांच्या आणि कुटुंबाच्या परवानगीनेच ठरलं होतं. परंतु, नवरीच्या बहिणीशी नवऱ्याचं अफेअर असल्याचं लग्नमंडपात घडलेल्या प्रकारानंतर समोर आलं अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नवऱ्याने लग्नमंडपाच्या वेशीजवळ येताच नवरीला पळवून नेलं. त्यामुळे पाहूण्यांसह नवरीला या धक्कादायक प्रकाराबाबत कळलच नाही. नवऱ्याने बहिणीसोबत असा भयंकर प्रकार केल्यानं नवरीच्या पायाखालची जमिनच सरकली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत झाडे दिसतात ना? पण एक स्री सुद्धा लपलीय, एकदा क्लिक करून बघा

मिळालेल्या माहितीनुसार, नवरा लग्नमंडपात आला होता पण अचानक गायब झाला. नवऱ्याचा शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही. काही वेळानंतर लोकांना समजलं की, नवरीची बहिणही गायब आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला की, नवऱ्याने चक्क मेव्हणीलाच पळवून नेलं आहे. नवऱ्याचं प्रेम नवरीच्या बहिणीशीही जडलं होतं, अशी चर्चा आहे. परंतु, या प्रेमप्रकरणाबाबत कुणालाच काही माहित नव्हतं. हे दोघेही कुठे गेले आहेत, याबाबत कोणतीच माहिती मिळत नाहीय. नवरीच्या कुटुंबियांनी नवरा आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केलीय. पोलीस नवरा आणि नवरीच्या बहिणीचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Story img Loader