Groom Firing With Revolver : लग्नसोहळ्यात अनेकदा अशा घटना घडतात, ज्यांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांचा थरकाप उडतो. लग्नमंडपात नवरा-नवरी थिरकताना दिसतात. हळदीच्या मंडपातही वधू-वरांनी भन्नाट डान्स केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण एका लग्नसोहळ्यातील थरारक व्हिडीओनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्टेजवर वरमाला घालण्याचा कार्यक्रम सुरु असताना नवऱ्याने अचानक बंदूक काढली आणि फायरिंग केली. नवऱ्याने केलेलं थरारक कृत्य पाहून नवरीला आणि वऱ्हाड्यांनाही धक्का बसला. लग्नसोहळ्यात वादविवाद झाल्यावर बंदुकीची फायरिंग केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण काही लोक त्यांच्या लग्नात लोकांच्या मनोरंजनासाठी चक्क बंदूक काढून हवेत फायरिंग करत असल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ mayank_purani नावाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ३३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “लग्न सोहळ्यात अशाप्रकारची फायरिंग करणे धोकादायक होऊ शकतं.” व्हायरल झालेला व्हिडीओला १३ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. लग्नसोहळ्यात नवरा-नवरीच्या भन्नाट डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण या व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. लोकांच्या मनोरंजनासाठी नवऱ्याने केलेलं कृत्य धोकादायक असल्याच्या प्रतिक्रिया इंटरनेटवर उमटताना दिसत आहेत.
नक्की वाचा – Viral Video : विंडो सीटवरून तरुणींमध्ये कुटाकुटी, विमानातच एकमेकींच्या झिंज्या उपटल्या
इथे पाहा व्हिडीओ
व्हायरल झालेल्या व्हिडीओत भर लग्नमंडपात नवरा हातात बंदूक घेऊन फायरिंग करताना दिसत आहे. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी नवऱ्याने बंदूक घेऊन हवेत फायर केलं. नवऱ्याने केलेला हा भन्नाट प्रकार पाहून नवरीला आणि वऱ्हाड्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. स्टेजवरील हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. एरव्ही लग्नातील मजेशीर किस्से व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल होतात. पण या व्हिडीओनं सर्वांचाच थरकाप उडवला आहे. मनोरंजन करण्यासाठी अशाप्रकारचे धोकादायक स्टंट करणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकरी या व्हिडीओला देत आहेत.