सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू झाली आहे. लग्न समारंभामध्ये केली जाणारी धम्माल हा बरेच दिवस चर्चेचा विषय असतो. वरपक्ष असो किंवा वधूपक्ष लग्नकार्य अधिक चांगले व्हावे यासाठी अनोख्या कल्पना लढवतात. तर काही वेळा अनपेक्षितपणे असे काही घडते की ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. असे सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओज तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क स्टेजवरच नवरदेवाबरोबर हाणामारी सुरू असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नवरा, नवरी स्टेजवर बसलेले दिसत आहेत आणि एक व्यक्ती नवरदेवाच्या मागे उभा राहिलेला दिसत आहे. हा व्यक्ती नवरदेवाची मस्करी करत सतत त्याचा फेटा काढण्याचा प्रयत्न करत आहे. यावर आधी नवरदेव काहीही प्रतिक्रिया देत नाही. पण नंतर मात्र नवरदेवाला राग अनावर होतो आणि तो त्या व्यक्तीला मारू लागतो, यावर तो व्यक्तीही प्रतिकार करतो. स्टेजवरच सुरू झालेली ही हाणामारी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : अजबच! सरकारी अधिकाऱ्यापुढे कुत्र्यासारखा भुंकू लागला हा माणूस; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटी! १९८५ मधील हे हॉटेलचे बिल पाहिले का? किंमत पाहून नेटकरी म्हणाले, ‘एवढ्या पैश्यात…’

हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले असून, ‘हा व्यक्ती आता कधीहो कोणाची मस्करी करणार नाही’ अशी कमेंट काहीजणांनी केली आहे. या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.