Bride and Groom Fight at Wedding: हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरीही हुंडा घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. लग्न म्हटलं की, गडबड गोंधळ आलाच. कधी डीजेवर नाचण्यावरून लग्नात वाद होतो. तर कधी नवरदेवाच्या हट्टामुळे याचा मनस्ताप मात्र, वऱ्हाडी मंडळींना सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधू समोर आला आहे. लग्नाच्या मध्येच नवरदेवाने अशी डिमांड केली की वधूपक्ष पुरता हादरला. यानंतर मात्र नवरदेवाला डिमांड करणं चांगलंच महागात पडलंय.  कारण ही मागणी एकुन नवरदेवाला चक्क झाडाला बांधून ठेवण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशात हुंड्याची मागणी नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबीयांना चांगलीचं महागात पडली आहे. सासरवाडीतील लोकांनी नवरदेवाला झाडाला बांधून ठेवत त्याच्या नातेवाईकांना ओलीस ठेवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात नेलं आहे. बुधवारी रात्री जौनपूर येथून मांधाता भागातील हरखपूर येथे हे वऱ्हाड आलं होतं. दरम्यान अचानक वराने हुंड्याची मागणी सुरू केली. यामुळे वधूच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला लोकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ठाम राहिल्याने संतप्त कुटुंबीयांनी नवरदेवाला झाडाला बांधले. यासोबतच वराचे अनेक नातेवाईक आणि वऱ्हाड्यांनाही कोंडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे लग्नस्थळी गोंधळ उडाला.

mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: विचित्र माणूस चक्क गाईच्या शेपटीला चावला, मग गाईनंही दाखवला असा इंगा की दिवसा दिसल्या चांदण्या

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना सोबत घेतले. पोलीस ठाण्यात दिवसभर यासंदर्भात गोंधळ सुरू राहिला. मात्र निकाल लागला नाही. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, हुंडा मागणाऱ्या अशा लोकांना आपली मुलगी कधीही देऊ नये. अशा लोकांना तुमची मुलगी देऊन तुम्ही तिला मरणाच्या खाईत ढकलत आहात. आणखी एका यूजरने लिहिले की, जवळपास सर्वच वडिलांनी हे काम केले पाहिजे, आजच्या काळात हुंडा हा एक शाप आहे.

Story img Loader