Grooms Chases Thief Viral Video: लग्नामधील अनेक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. लग्नसमारंभात वराची वरात मुख्य आकर्षण ठरते, पण हीच वरात सोडून जर वर पळून गेला तर. सध्या अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे, ज्यात एक वर चक्क आपली वरात सोडून चोराच्या मागे पळाला. नेमकं असं घडलं तरी काय? जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये चालत्या ट्रकला लटकल्याचा वराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने वराच्या वरमालेमधील नोट हिसकावून घटनास्थळावरून पळ काढल्याने ही घटना घडली.

हेही वाचा… …म्हणून मैत्री विचार करून करा! भररस्त्यात तरुणीचा स्कर्ट फाटला अन् मित्र हसायला लागला, पण पुढे जे घडलं ‘ते’ VIDEO मध्ये पाहून कराल कौतुक

समारंभानंतर घोड्यावर बसून मंदिराकडे निघालेल्या वराने विधी सोडून चोराचा पाठलाग केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीने ट्रक घेऊन पळ काढला. वरदेखील चोराच्यामागे ट्रकच्या खिडकीला लटकून ड्रयव्हर सीटकडे गेला. कुटुंबातील सदस्य आणि लग्नात आलेले पाहुणेदेखील वराचा आणि चोराचा पाठलाग करत होते. जेव्हा चोराने वाहन थांबवण्यास नकार दिला, तेव्हा एक माणूस मोटारसायकल घेऊन ट्रकच्या समोर आला आणि ट्रकचालकाला ट्रक थांबवावा लागला. संतप्त झालेल्या वरासह नातेवाईकांनी आरोपीला मारहाण केली.

एका वाटसरूने हा संपूर्ण प्रसंग त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ @hindipatrakar या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मेरठमध्ये वर घोड्यावर स्वार होता, एका चोरट्याने त्याच्या नोट असलेल्या वरमालेमधून एक नोट हिसकावून पळ काढला. लग्नाचे विधी सोडून वर चोराच्या मागे धावला. चोराने ट्रक सुरू केला आणि तो निघून जाऊ लागला. वराने खिडकीतून धावत्या ट्रकमध्ये प्रवेश केल्यावर चोर ट्रक सोडून पळू लागला. वराने चोरट्याला पकडून बेदम मारहाण केली”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… एवढा पैसा कुठे घेऊन जाणार? जमिनीच्या वादावरून वयोवृद्धावर काठीने केला हल्ला, वाचवायला तरुणी मध्ये आली पण…, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “वर जेम्स बाँड निघाला.” तर दुसऱ्याने, “भावाने एका नोटेसाठी बॉलीवूडच्या ॲक्शन चित्रपटालापण फेल केलं” अशी कमेंट केली. तर “वर एकदम हिरो निघाला”, “वर पोलिस अधिकारी आहे असं वाटतं”, “वधूचं भविष्य सुरक्षित आहे” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.