लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो त्यामुळे त्यामध्ये कोणतीही गडबड होऊ नये असे प्रत्येक नवरी किंवा नवरदेवाला वाटत असते. पण लग्नाच्यावेळी नेहमी काही ना काही गडबड होत असते पण तरीही सर्व अडचणींवर मात करत अखेर दोघेही विवाह बंधणात अडकले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती एका नवरदेवाची झाली आहे ज्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवरदेवाची स्वत:च्या लग्नाच्या वरातीमध्ये सहभागी होण्यासाठी तारांबळ उडाली आहे. रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमधून नवरदेव रस्त्याने धावताना दिसत आहे. प्रचंड वाहतूक कोंडीतून कसा तरी वाट शोधत तो धावत आहे. व्हिडिओ शुट करणारी व्यक्ती विचारते, “ए नवरदेव कुठे निघाला आहे.” धावताना नवरदेव कॅमेऱ्याकडे पाहात म्हणतो की, वरात निघून जाईल, वरात मला सोडून गेली आहे. त्याचे भाऊ त्याला लग्नामध्ये लवकर पोहोचण्यासाठी मदत करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तो एका कारचालकाला रस्ता ओलांडण्यासाठी त्याचे वाहन मागे घेण्याची विनंती करताना दिसतो.

काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ इंस्टाग्राम वापरकर्ता शौर्य दावर यांनी शेअर केला होता आणि त्याला जवळजवळ एक लाख लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.

“तुम्ही तुमच्या वयाच्या तिशीमध्ये आहाता आणि लग्न करण्याचा हा तुमचा पहिला आणि शेवटचा क्षण आहे आणि तुमच्या मार्गात इतकी वाईट वाहतूक कोंडी आहे तुम्हाला आश्चर्य वाटू लागते की, विश्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, “भाऊ, अविवाहित राहा, ते अधिक सुरक्षित आहे,” असे वापरकर्त्याने त्याच्या पोस्टला कॅप्शन दिले.

या व्हिडिओवर सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी मेट्रो शहरांमधील वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधले, तर काहींनी मदत ऑफर केली.

“अहो, वरात आणि वराती वेळेवर पोहचले आहे पण नवरदेव संध्याकाळी चालायला गेला आहे, येत असेल” अशी कमेंट केली आहे.

“नवराच्या वडिलांनी म्हणतील… मी वचन दिले आहे की नवरदेवा आला किंवा नाही आला तरी मुलाचे कुटुंबाला रात्री ८ वाजता पोहोचेन.”

ज्या वरातीमुळे वाहतूक कोंडी झाली तोच नवरा वाहतूक कोंडीत अडकला आहे.

नवरदेवाच्या वडीलांसाठी वक्तशीरपणा सर्वात महत्त्वाचा आहे, त्यांनी आपल्या मुलाला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवला आहे.

एवढा निवांत नवरा तर मलाही पाहिजे

भाऊ तुम्ही पार्किंमध्ये मित्रांकडे गेला होते का?

उफ्फ, ही दहा हजार पाऊले पूर्ण करण्याची सवय

“ट्रॅफिकमध्ये लोक विचार करत आहेत की वरता पुढे का जात नाही, भाऊ, नवरदेव आला तर वरात हॉलमध्ये प्रवेश करेल ना, हे पहिले लग्न असेल जिथे तुम्ही नवरदेवाशिवाय वरात पाहून मुलीकडील लोक घाबरणार नाहीत.