लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत आणि नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाहीत. अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो… लग्नात नवरा-नवरीची एन्ट्री हा विषय पाहण्यासारखा झालाय. सध्या सोशल मीडियावर नवरा-नवरीच्या हटके एन्ट्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमची नजर व्हिडीओवरून हटणारच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवरा-नवरी त्यांच्या लग्नातली एन्ट्री सर्वांच्याच आठवणीत राहावी यासाठी नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जातात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या नवरा नवरीने कोणत्या हेलिकॉप्टरमधून नव्हे, कारमधून नव्हे तर चक्क सायकल रिक्षामधून हटके एन्ट्री केलीय. रंगीरेबरंगी फुलांनी सजवलेल्या सायकल रिक्षामध्ये नवरा स्वतः ही सायकल रिक्षा चालवतावा दिसून येतोय. तर मागच्या सीटवर नवरी बसलेली दिसून येतेय. नवरा-नवरीची ही जरा हटके एन्ट्री पाहून मंडपातील सारेच जण टाळ्यांच्या गडगडाट स्वागत करताना दिसून येतेय. या व्हिडीओच्या बॅग्राऊंडला ‘धूम मचाले धूम’ गाणं वाजताना ऐकू येत आहे.

नवरा-नवरीचा हा अनोखा स्वॅग पाहून पाहुणे मंडळीदेखील याचीच चर्चा करीत आहे. या व्हिडीओमधील नवरीने नवरदेवाच्या पोशाखाला मॅचिंग असा लेहंगा आणि भरपूर दागिने घातलेले आहेत. ही नवरी मागच्या सीटवर बसून सायकल रिक्षाच्या सवारीची मजा घेताना दिसत आहेत. या नवरी-नवरदेवाची जोडी लोकांना खूप आवडली आहे.

‘द वेडिंग स्टोरिज’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत १६ हजारपेक्षाही अधिक वेळा पाहिला गेला आहे. सर्वांनाच या नवरा-नवरीची रॉकिंग एन्ट्री खूप आवडली आहे. कमेंटमध्येही लोक आपल्या लग्नात अशीच एन्ट्री करण्याचा प्लान करीत आहेत.