Shocking video: एखाद्या लग्नातील सर्वात वाईट वेळ कोणती असू शकते? हा व्हिडिओ पाहून कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल… कल्पना करा की वराच्या पेहरावात तुम्ही स्टेजवर उभे आहात… तुमच्यासमोर होणारी वधू तुमचा हातात हात घेऊन उभी आहे. तुमची सगळे नातेवाईक आणि मित्र-मंडळी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी समोर जमले आहेत आणि एवढ्यात तुमची एक्स-गर्लफ्रेंड तुमच्यासमोर येऊन उभी राहिली तर…कल्पना करूनच सुन्न झालं असेल ना! पण अशी वेळ खरोखरच एका वरावर येऊन ठेपली आणि मग पुढे काय घडलं, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावरही दाखल झाला. हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला, हे काही वेगळं सांगायला नको…

सध्या सगळीकडे धुमधडाक्यात लग्नसराई सुरू आहे. सोशल मीडियावर सुद्धा लग्नाचे अनेक व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी मजेशीर प्रथा पाहायला मिळतात तर कधी भन्नाट उखाणे ऐकायला मिळतात. नवरदेव नवरीचे अनेक मजेशीर किस्से सुद्धा व्हायरल होतात. अनेकदा लग्नात असे काही प्रसंग घडतात की ते पाहून कधी हसू आवरत नाही तर कधी विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेवाबरोबर असे काही घडते की कोणीही अवाक् होईल.

Viral Video Of Husband and wife
‘कोणाचीही पर्वा न करता…’ बायकोला नाचताना पाहून ‘त्याने’ही धरला ठेका; व्हायरल VIDEO नक्की बघा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
husband dance with disabled wife
‘असे टिकते नाते!’ दिव्यांग पत्नीसाठी नवऱ्याने केला जबरदस्त डान्स! VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावरील येईल हसू
unknown girl gave flowers
‘भावाची विकेट पडली ना राव’ अनोळखी तरुणीनं दिलं फुल अन् तो लाजला; VIDEO पाहून तुम्हालाही विश्वास बसेल लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात
son-in-law dance with father-in-law
‘बाबा, असा जावई शोधून सापडणार नाही…’ भरमंडपात जावयानं भावी सासऱ्यांबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वधू वराच्या गळ्यात हार घालते. त्यानंतर नवरदेव वधूच्या गळ्यात हार घालणार तोच एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर पोहोचते. यानंतर स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होतो. एक्स गर्लफ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतले. एक्स गर्लफ्रेंडने इतके जोरात मारले की नवरदेव स्टेजवरच पडला. हे सगळे घडत असताना नवरी पाहतच राहिली. तिला नेमकं काय घडतेय हे काही क्षण समजलेच नाही.एक्स गर्लफ्रेंडने मारल्यानंतर नवरदेव स्टेजवर पडला होता. त्यानंतरही तिचा राग शांत झाला नाही, ती त्याला मारहाण करायचे सोडत नाही. काही लोकांनी दिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबायचं नाव घेत नव्हते. हा सगळा प्रकार पाहून लग्नातील वराती थक्क झाले. काही महिलांनी स्टेजवर धाव घेत त्या मुलीसोबत बोलून प्रकरण शांत केलं. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत असून 3 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: भिवंडीमधला थरारक लाईव्ह अपघात; कार चालकाचं नियंत्रण सुटलं अन् भयंकर घडलं, सांगा चूक नक्की कुणाची?

अवघ्या १५ सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय… एखाद्या बॉलिवूड सिनेमाला शोभेल अशी घटना असली तरी ती खऱ्या आयुष्यात घडलीय. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत म्हंटलंय, ठखतम टाटा बाय बाय आता काही खरं नाही नवरदेवाचं”

Story img Loader