Viral video: आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाचे सीझन अजून काही संपलेले नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. वधू-वरांशी संबंधित व्हिडीओ इंटरनेटवर खूप पसंत केले जातात. लग्नादरम्यान वधू-वरांसोबत काही मजेदार गोष्टी घडल्या तर ते लोकांना बघायला खूप आवडतात.

मित्र हे नेहमीच एकमेकांची मस्करी करत मजा घेत असतात, मग त्याला वेळ काळ, ठिकाण असं काही लागत नाही. मग ते मित्राचं लग्न का असेना. अशाच मित्रांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरदेवाच्या बाजूला त्याचा मित्र बसला आहे. यावेळी नवरदेवाच्या गळ्यात पैशाची माळ घातली आहे. आणि याच पैशांवर त्याच्या मित्राचा डोळा आहे. त्याची सारखी नजर त्या नोटांवरच असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान योग्य संधी साधून नवरदेवाचा डोळा चकवून तो मित्र एका नोटेवर डल्ला मारतोच. तो गपचूप नोट काढतो आणि खिशात घालतो. दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एकानं याचा व्हिडीओ काढला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जस्ट लूकिंग लाईक…”, अमृता फडणवीसांच्या चाहत्यांना नववर्षाच्या ‘वॉव’ शुभेच्छा! व्हायरल VIDEO तुम्ही पाहिलात का?

यावर कमेंट करून लोक नवरदेवाची मस्करी करत आहेत. अशा मित्रांना लग्नातच बोलवायचं नाही. यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grooms friend secretly steals the money from his necklace funny video viral on social media srk